ETV Bharat / state

PM Modi Shirdi Visit : 'भटक्या कुत्र्यांना सुरक्षित ठिकाणी...', पक्षी-प्राणी मित्राची मागणी - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर आहेत. मोदींच्या या दौऱ्यानिमित्तानं मोठा पोलीस बंदोबस्त शिर्डीत लावलाय. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलिसांनी मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांची काही तरी कायमस्वरुपी सुरक्षित ठिकाणी सोय करण्याची मागणी, महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार सन्मानित पक्षी प्राणी मित्र सुशांत घोडके यांनी केलीय.

stray dogs in shirdi
भटकी कुत्रे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 2:19 PM IST

Updated : Oct 26, 2023, 2:35 PM IST

शिर्डीतील भटक्या कुत्र्यांना सुरक्षित ठिकाणी न्यावं, अशी मागणी

अहमदनगर (शिर्डी) PM Modi Shirdi Visit : सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. यात राजकीय नेत्यांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असतो. मात्र,जेव्हा राज्यासह देशातील कोणतेही राजकीय नेते साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असतील तेव्हा साईबाबा मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांना हाकलण्यात येतं. मात्र असं न करता शिर्डी साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषद यांनी शिर्डीतील भटक्या कुत्र्यांची चांगल्या पद्धतीनं कुठेतरी कायमस्वरूपी व्यवस्था करायला पाहिजे, असं महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार सन्मानित पक्षी प्राणी मित्र सुशांत घोडके म्हणाले आहेत.

भटक्या कुत्र्यांचं संगोपन करावं : देशातील दोन नंबर आणि राज्यातील एक नंबरचं श्रीमंत साईबाबा देवस्थान आहे. साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेनं शिर्डीतील आणि मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांसाठी शिर्डीत किंवा शिर्डीच्या जवळपास कुठेतरी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करून त्यांचं संगोपन करायला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रपतींचा गाड्यांचा ताफा साईबाबा मंदिरात जात असताना एक कुत्रे ताफ्याला आडवे पळत असल्यानं पोलिसांची मोठी धांदल उडाली होती. यामुळे साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदनं या भटक्या कुत्रांची कायमस्वरूपी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करावी असंही घोडके म्हणाले आहेत.

दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले भाविक या भटक्या कुत्र्यांना आपल्याकडं असेल ते खायला घालतात. यामुळं साईबाबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आढळतात. आज मोदी शिर्डी दौऱ्यावर असल्यानं साईबाबा मंदिर परिसरासह शिर्डीतील प्रमुख ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. तसंच यामुळं आज रस्त्यावर कुत्र्यांचं प्रमाण देखील कमी दिसून आलं.

हेही वाचा -

  1. PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणारा शिर्डीतील दर्शनरांग प्रकल्प कसा आहे? पाहा व्हिडिओ
  2. PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदी शिर्डीत दाखल ; सुमारे ७५०० कोटींच्या विविध विकासकामांचं होणार लोकार्पण
  3. PM Modi Inaugurate Namo Bharat Rail : देशातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; काय आहेत या रेल्वेची वैशिष्ट्ये?

Last Updated : Oct 26, 2023, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.