अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा अकोले येथील अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गायकर यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
गायकर अजितदादांचे 'खास'
राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यासह सीताराम पाटील गायकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये मुंबई येथे पक्ष प्रवेश केला होता. पहिल्यापासून माजी मंत्री पिचड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळ्खले जाणारे गायकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चांगले संबंध होते. त्यामुळेच गायकर यांना महानंदाचे संचालक व जिल्हा बँकेचे सलग सहा वर्षे अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीतही अजित पवार यांनी आपल्या या समर्थकासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली व गायकर यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेले ज्येष्ठ नेते दशरथ सावंत व उद्योजक सुरेश गडाख यांनां स्वतः फोन करत भेट घेऊन त्यांची मनधरणी करावी लागली होती. त्यामुळे गायकर यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला होता. त्यावेळेस देखील माझ्या विजयाचे शिल्पकार हे अजित पवार हेच असल्याची कृतज्ञता गायकर यांनी व्यक्त केली होती.
गायकर समर्थकांमध्ये उत्साह
अकोले विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड यांचा पराभव होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ किरण लहामटे हे आमदार म्हणून विजयी झाले. विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार पिचड यांची गायकर व समर्थक कार्यकर्ते यांच्याबद्दल नाराजी झाली होती. गायकर व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये दुजाभावाची वागणूक मिळत असल्याबद्दल पिचडांविषयी नाराजी होती. भाजप पक्ष प्रवेश हाच मुळात गायकर समर्थकांना मान्य नव्हता. त्यामुळे तालुक्यात गायकर समर्थक अस्वस्थ होते. जिल्हा बँकेच्या निवडणूक काळातच गायकर यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा प्रवेश सोहळा पुढे ढकलला गेला. अखेर गायकर यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यास मंगळवारचा मुहूर्त मिळाला. आगामी अगस्ति कारखाना, अकोले नगर पंचायत व अन्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गायकर यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश होत असल्याचे समजताच गायकर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिचड यांचे कट्टर समर्थक सीताराम गायकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित - ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गायकर यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.