ETV Bharat / state

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर टोलविरोधात ढोकी ग्रामस्थांचे आंदोलन

त्रिवेंद्रम-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ढोकी येथे आठ दिवसापासून टोलनाका सुरू झाला आहे. स्थानिकांना टोलमधून न वगळता त्यांच्याकडूनही टोल वसुली सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत ढोकी टोलनाक्यावर टोलबंद आंदोलन केले.

ग्रामस्थांचे आंदोलन
author img

By

Published : Feb 28, 2019, 12:37 PM IST

अहमदनगर - पारनेर तालुक्यातून जाणाऱ्या त्रिवेंद्रम-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ढोकी येथे आठ दिवसापासून टोलनाका सुरू झाला आहे. मात्र स्थानिकांना टोलमधून न वगळता त्यांच्याकडूनही टोल वसुली सुरू आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना टोलमधून सवलत दिली जावी, अशी मागणी करत नागरिकांनी आंदोलन केले.

ग्रामस्थांचे आंदोलन

याबाबत स्थानिक नागरिकांसह परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत ढोकी टोलनाक्यावर टोलबंद आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजित झावरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. टोलचे व्यवस्थापक लॉरेन्स स्वामी यांच्याशी सकारात्मक चर्चा करुन त्यांनीस्थानिकांना दिलेल्या टोलबंदआश्वासनानंतरपारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

'आधार'दाखवून टोल माफी..

आंदोलनानंतर टोल कंपनी व्यवस्थापनाने आंदोलकांची मागणी तात्पुरती मान्य करत स्थानिकांनी आधार कार्ड दाखवल्यानंतर त्यांना टोलमधे सूट देण्याचे कबूल केले. मात्र राज्यमार्गाचे आणि राष्ट्रीय महामार्गाचे टोलबाबत नियम-अटी या वेगवेगळ्या असल्याचे सांगत याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन टोलबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुजित झावरे यांनी स्थानिकांकडून टोल वसुलीला सुरुवात केल्यास पुन्हा आंदोलन करुन संपूर्ण टोल वसुली बंद पाडू, असा इशारा देण्यात आला.

जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही

त्रिवेंद्रम-कल्याण या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 साठी पारनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने अधिग्रहित केल्या. मात्र त्याचा मोबदला आणि नुकसानभरपाई अद्याप दिली नसल्याचा आरोप यावेळी बोलताना झावरे यांनी केला. एकीकडे जमिनीचा मोबदला मिळाला नसताना आता त्यांनाही टोल लावला जात असल्याबद्दल झावरे यांनी संताप व्यक्त केला. रोजच्या कामानिमित्ताने स्थानिकांना अनेकदा यामार्गावरून ये-जा करावी लागत असल्याने टोल माफी कायम रहावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

undefined

आंदोलनात अरुण ठाणगे, बाबासाहेब खिलारी, अशोक कटारिया, किसान धुमाळ , भगवान वाळुंज, उमाजी वाळुंज, गंगाधर बांडे, मोहन रोकडे यांच्यासह शेकडो नागरिक हजर होते.

Intro:अहमदनगर- कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या विरोधात ढोकी ग्रामस्थांचे आंदोलन..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे.

अहमदनगर- कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या विरोधात ढोकी ग्रामस्थांचे आंदोलन..

अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातुन जाणाऱ्या त्रिवेंद्रम - कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील ढोकी (ता . पारनेर )येथील टोल नाका आठ दिवसापासून सुरु झाला आहे. मात्र स्थानिकांना टोल मधून न वगळता त्यांच्याकडूनही जबरदस्तीने टोल वसुली सुरू होती. यामुळे स्थानिक नागरिकांना टोल मधून सवलत दिली जावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुजित झावरे यांनी करत आंदोलन केले. याबाबत स्थानिकासह परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत ढोकी टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन केले . यावेळी सुजित झावरे यांचेसह शेकडो कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजार होते . यावेळी टोलचे व्यवस्थापक लॉरेन्स स्वामी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून त्यांनी दिलेल्या स्थानिकांना टोलबंद  आश्वासना नंतर   पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार याना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

'आधार'दाखवून टोल माफी..
-आंदोलना नंतर टोल कंपनी व्यवस्थापनाने आंदोलकांची मागणी तात्पुरती मान्य करत स्थानिकांनी आधार कार्ड दाखवून टोल मधे सूट देण्याचे कबूल केले. मात्र राज्यमार्गाचे आणि राष्ट्रीय महामार्गाचे टोल बाबत नियम-अटी या वेगवेगळ्या असल्याचे सांगत याबाबत वरिष्ठांन कडून मार्गदर्शन घेऊन टोल बाबत पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. तर आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुजित झावरे यांनी स्थानिकांन कडून टोल वसुली सुरुवात केल्यास पुन्हा आंदोलन करून संपूर्ण टोल वसुली बंद पाडू असा इशारा दिला.

जमीनी देणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही !!
-यावेळी बोलताना झावरे यांनी त्रिवेंद्रम-कल्याण या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 साठी पारनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने अधिग्रहित केल्या, मात्र त्याचा मोबदला आणि नुकसानभरपाई अद्याप दिली नसल्याचा आरोप केला. एकीकडे जमिनीचा मोबदला मिळाला नसताना आता त्यांनाही टोल लावला जात असल्या बद्दल झावरे यांनी संताप व्यक्त केला. रोजच्या कामानिमित्ताने स्थानिकांना अनेकदा यामार्गावरून ये-जा करावी लागत असल्याने टोल माफी कायम रहावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली..
आंदोलनात मार्केट कमिटीचे सदस्य  अरुण ठाणगे ,, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष  बाबासाहेब खिलारी , नगर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष  अशोक कटारिया , मार्केट कमिटीचे उपसभापती  विलास झावरे  कोरठण विश्वस्त  किसान धुमाळ , भगवान वाळुंज , उमाजी वाळुंज , गंगाधर बांडे , मोहन रोकडे . यांचे सह शेकडो कायकर्ते हजर होते.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या विरोधात ढोकी ग्रामस्थांचे आंदोलन..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.