ETV Bharat / state

'महाराष्ट्र केसरी'च्या गावात जल्लोष! - Maharashtra kesari news

हर्षवर्धनला महाराष्ट्र केसरी होण्याची फार पूर्वीपासून इच्छा होती. त्याचे आजोबदेखील नामांकित पैलवान होते. मागील पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात 'अर्जुन'वीर वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. साई समाधी शताब्दी उत्सवानिमित्ताने शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवले आहे. तसेच हरियाणातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतसुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे.

people of kobhalne  celebrated harshavardhan,s victory
'महाराष्ट्र केसरी'च्या गावात जल्लोष!
author img

By

Published : Jan 8, 2020, 1:53 AM IST

अहमदनगर - महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेते पद पटकविल्यानतंर हर्षवर्धन मुकेश सदगीर याच्या कोंभाळणे या मूळ गावात एकच जल्लोष करण्यात आला. हर्षवर्धनने लातूरच्या शैलशे शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली आहे.

हेही वाचा - दीपिका पदुकोणने घेतली जेएनयू विद्यार्थ्यांची भेट, विद्यार्थ्यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

मंगळवारी पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या 'महाराष्ट्र केसरी 2020' स्पर्धेत अंतिम सामन्यात हर्षवर्धनने 'महाराष्ट्र केसरी'चा किताब मिळवत अकोले तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. टाहाकारी येथील अंबिका विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या मुकेश सदगीर यांचा हर्षवर्धन हा मुलगा आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून आई ठकूबाई सदगीर या गृहिणी आहेत तर भाऊ जगन सदगीर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी करत आहे. सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत हर्षवर्धनने गतविजेता अभिषेक कटके याचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानतंर कोंभाळणे गावातील उपसरपंच , ग्रामस्थांसह, नातेवाईक अंतिम सामना पाहण्यासाठी बालेवाडी स्टेडियम येथे गेले होते. दरम्यान, हर्षवर्धनने अंतिम सामन्यात विजय मिळवताच गावात फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष करण्यात आला.

हर्षवर्धनचे आजोबा देखील नामांकित पैलवान होते. मागील पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात 'अर्जुन'वीर वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. साई समाधी शताब्दी उत्सवानिमित्ताने शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवले आहे. तसेच हरियाणातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतसुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे. गतवर्षी जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत येऊनसुद्धा त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याला 'महाराष्ट्र केसरी' होण्याची फार पूर्वीपासून इच्छा होती. यासाठी त्याने अतोनात परिश्रम घेत आपले स्वप्न पूर्ण केले. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गावाचे नाव राज्याच्या कान्याकोपऱ्यात पोहचवले असून गावाचा व समाजाचा सन्मान वाढविला असल्याची प्रतिक्रिया उपसरपंच गोविंद सदगीर यांनी दिली.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेते पद पटकविलेले अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावचे सुपुत्र हर्षवर्धन मुकेश सदगीर याने महाराष्ट्र केसरी 2020 हा मानाचा किताब मिळविल्याची माहिती कळताच अकोले तालुक्यासह त्याचे मुळगाव असणाऱ्या कोंभाळणे गावात एकच जल्लोष साजरा करण्यात आला....

VO_ अकोले तालुक्यातील अंबिका विद्यालय टाहाकारी येथील विद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत असणाऱ्या मुकेश सदगीर यांचा हर्षवर्धन हा मुलगा आहे आज सायं पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये झालेल्या महाराष्ट केसरी 2020 स्पर्धेत अंतिम सामन्यात विजयी मिळऊन महाराष्ट्र केसरी हा किताब अकोले तालुक्याला मिळवून देऊन अकोले तालुक्यात मानाचा तुरा खोवला आहे...हर्षवर्धन ची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून त्याची आई ठकूबाई सदगीर या गृहिणी आहेत तर भाऊ जगन सदगीर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी करत आहे...काल सोमवारी उपांत पूर्व फेरीत हर्षवर्धन ने गत विजेता अभिषेक कटके याचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केल्यावर कोंभाळणे गावातील उपसरपंच गोविंद सदगीर सह त्याचे काका राजेंद्र सदगीर,आजोबा कोंडाजी ढोन्नर, किसन सदगीर ,ग्रा पं सदस्य आनंदा सदगीर, मधुकर बिन्नर, बाळासाहेब सदगीर, संतोष सदगीर,महेश सदगीर, सीताराम बेनके, यांचे सह ग्रामस्थ अंतिम सामना पाहण्यासाठी बालेवाडी स्टेडियम येथे गेले होते...कोंभाळणे येथील तरुण व ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी हर्षवर्धनने अंतिम सामन्यात विजय मिळवताच गावात फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष साजरा केलाय....

VO_ अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावाची लोक संख्या तब्बल अठाराशे ते दोन हजार या छोट्याशा आदिवाशी गावचा सुपुत्र हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याने आपल्या गावाचे नाव आज राज्याच्या काण्या कोपर्यात नेऊन ठेवले आहेत..हर्षवर्धन चे आजोबा नामांकित पैलवान होते...पाच वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वस्ताद अर्जुन वीरकाकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे..साई समाधी शताब्दी उत्सवा निमित्ताने शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवले आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथे सुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे...गतवर्षी जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत येऊनसुद्धा पैलवान हर्षवर्धनने स्पर्धेतून माघार घेतली होती..हर्षवर्धन ला महाराष्ट्र केसरी होण्याची पहिल्या पासून इच्छा होती.यासाठी त्याने अतोनात परिश्रम घेतले..गावचा व समाजाचा सन्मान त्याने वाढविला असल्याची माहिती कोंभाळणे गावचे गोविंद सदगीर उपसरपंच यांनी दिली आहेत....
Body:mh_ahm_shirdi_sadgir maharashtra kesari_7_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sadgir maharashtra kesari_7_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.