ETV Bharat / state

रेखा जरे हत्याकांड : पारनेर कोर्टाकडून बाळ बोठेविरूद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी - रेखा जरे हत्याकांड आरोपी बाळ बोठे स्टॅंडिंग वॉरंट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि तेजस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणात अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे आरोपी आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र, त्यांना अद्याप यश आले नाही. या दरम्यान पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर काल (बुधवारी) निर्णय दिला.

Rekha Jare murder case
रेखा जरे हत्याकांड
author img

By

Published : Jan 7, 2021, 7:42 AM IST

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित पत्रकार बाळ बोठे अद्याप फरार आहे. त्याच्याविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी झाले आहे. पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर काल (बुधवारी) निर्णय दिला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी हा निर्णय दिला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

बोठेच्या अडचणी वाढल्या -

पारनेर न्यायालयाच्या या वॉरंटमुळे फरार असलेल्या बोठेच्या अडचणी वाढल्या आहेत. या वॉरंटमुळे पोलीस बोठेला राज्यात व अन्य राज्यात कोठेही पकडू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या व यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला रात्री हत्या झाली. या हत्याकांडमध्ये पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. या हत्येमागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तेव्हापासून बाळ बोठे हा फरार आहे. पोलीस महिनाभरापासून त्याच्या मागावर आहेत. यादरम्यान त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला. न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी बोठेविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट मिळावे यासाठी पारनेर न्यायालयात एक जानेवारीला अर्ज केला होता. बोठेने या अर्जाला आव्हान दिले होते. अ‌ॅड. संकेत ठाणगे यांच्या माध्यमातून त्याने आव्हान दिले होते. त्यावरनिर्णय देत बोठे याच्याविरुद्ध न्यायालयाने स्टॅंडिंग वॉरंट जारी केले आहे. बोठेने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होईल असे सांगण्यात आले.

बाळ बोठेने दिली होती सुपारी -

पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील घाटात 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा आणि सुपा पोलिसांकडून तपास सुरू होता. हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्या आरोपींनी बाळ बोठेने त्यांना सुपारी दिल्याचे कबुल केले होते.

बोठेच्या घराची तीनदा झडती -

आरोपी बाळ बोठे याच्या घरी आणि ऑफिसमध्ये आतापर्यंत तीनदा झडती घेण्यात आली आहे. त्या ठिकाणी काही ठोस पुरावे मिळाले असून आता आरोपी बोठेच्या ठिकाणाबाबत माहिती मिळवण्यास पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलिसांची पाच पथके जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर त्याचा शोध घेत आहे. तो नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलीस तिथे पोहचण्या अगोदरच तो तेथून फरार झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.