अहमदनगर - संगमनेर मतदारसंघ हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणच्या स्थानिक संस्थावर अनेक वर्षांपासून थोरातांचे वर्चस्व राहिले आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकींमध्ये थोरातांपुढे अद्याप एकाही उमेदवाराला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. १९८२ पासून सलग ६ वेळा ते या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. विरोधकांचे एकमत नसल्याने थोरात नेहमीच आघाडीवर राहिले. मात्र, यंदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
थोरातांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही १ लाख ३ हजार ५६४ एवढी मतं घेऊन शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा ६० हजारांच्या फरकाने पराभव केला. मात्र, आता थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली, तर तिकडे राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. त्यामुळे थोरात आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष पाहता यंदा विखे पाटील थोरातांसमोर मोठे आव्हान उभे करू पाहत आहेत. त्यातच विखे पाटलांच्या संगमनेरमध्ये वाऱ्या वाढल्या आहेत. थोरातांना शह देण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत.
या मतदारसंघात विखे पाटील ज्या उमेदवाराला उभे करतील त्याच्या मागे पक्षासह विखेंची ताकद उभी राहणार असल्याने यावेळी थोरातांना निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला राहिला आहे. शिवसेनेकडून जनार्दन आहेर यांचे नाव यंदाही चर्चेत आहे. मात्र, विखे पाटील कोणाच्या झोळीत माप टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संगमनेर मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न
- निळंवडे धरणाचे रखडलेले कालवे
- शहरातील नियोजनात्मक विकास
- प्रकिया उद्योग
संगमनेर विधानसभा २०१४ मध्ये पडलेली मत
- बाळासाहेब थोरात (काँग्रेस) - १०३५६४
- जनार्दन आहेर (शिवसेना) - ४४७५९
- राजेश चौधरी (भाजप) - २५००७
Intro:Body:
शिर्डी विधानसभा PKG....पुन्हा पाठवले आहे आता फीड FTP केले आहेत यात बाईट आहेत आधीच्या याच्यात बाईट नव्हता तसेच विधानसभा २०१४ ची आकडेवारी नव्हती.....
Feed Path FTP_28 Aug Shirdi Vidhansabha PKG
राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी लोकसभा मतदार संघात ऐकून विधानसभेच्या 6 जागा असून भाजप 4 काँग्रेस 2 राष्ट्रवादी आणि शिवसेनेकड़े एक ही नाही...अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक पर्यटन असा विविधतेने नटलेला आहे..महत्वाचे म्हणजे सहकाराची पंढरी म्हणून या उत्तर भागाची ओळख आहे..त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगा कळसूबाई शिखर हरिषचंद्र गड शिर्डी साईबाबा असे धार्मिक तिर्थस्थळे या उत्तर नगर भागात आहेत...अहमदनगर उत्तर भागात नेहमीच राजकीय उलथापालथी इथे होत असतात कोणत्याही निवडणुका आल्या की समीकरणे अगदी चुटकीसरशी बदलतात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तेच पाहायला मिळालं आणि आगामी विधानसभा निवडणुकीतही तेच होण्याची शक्यता आहे....
...........................................................................................................................................................................................................
शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहे...अकोले, संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे....
1 ) संगमनेर विधानसभा_बाळासाहेब थोरात_काँग्रेस
2 ) शिर्डी विधानसभा_राधाकृष्ण विखे पाटील_भाजप
3 ) कोपरगाव विधानसभा_स्नेहलता कोल्हे_भाजप
4 ) श्रीरामपूर विधानसभा _भाऊसाहेब कांबळे_काँग्रेस
5 ) नेवासा विधानसभा_ बाळासाहेब मुरकुटे_भाजप
6 ) अकोले विधानसभा_वैभव पिचड़_भाजप
...........................................................................................................................................................................................................
संगमनेर_विधानसभा मतदारसंघ......
संगमनेर मतदारसंघ हा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे..पंचायत समिती जि.प..नगरपालिका अनेक ग्रामपंचायती आणि स्थानिक संस्थावर थोरातांच वर्चस्व राहिलं आहे..आजवरच्या विधानसभा निवडणुकींमध्ये थोरातांपुढे अद्याप एकाही उमेदवाराला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही...1982 पासून सलग ते सहा वेळा आमदार राहिले आहेत..विरोधकांचं एकमत नसल्याने थोरात नेहमीच आघाडीवर राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी 1 लाख 3 हजार 564 एवढी मतं घेऊन शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा 60 हजारांच्या फरकाने पराभव केला....बाळासाहेब थोरात यांची कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली..तिकडे विखे पाटील भाजपवासी झाले..थोरात आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष पाहता विखे पाटील थोरातांसमोर मोठ आव्हान उभ करु पाहत आहे..राधाकृष्ण विखे पाटीलांच्या संगमनेर वा-या वाढल्या आहेत..थोरातांना शह देण्यासाठी ते अटोकाट प्रयत्न करत आहेत. विखे पाटील ज्या उमेद्वाराला उभ करतील त्याच्या मागे पक्षासह विखेंची ताकद उभी राहणार असल्याने यावेळी थोरातांना प्रयत्नांची पर्काष्टा करावी लागणार आहे..युतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेच्या वाटेला राहिलाय.शिवसेनेकडुन जनार्दन आहेर यांच नाव यंदाही चर्चेत आहे मात्र विखे पाटील कोणाच्या झोळीत माप टाकणार हे पाहण सध्या तरी महत्वाच ठरणार आहे....
...........................................................................................................................................................................................................
संगमनेर _मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न....
निळंवडे धरणाचे रखडलेले कालवे...
शहरातील नियोजनात्मक विकास...
प्रकिया उद्योग...
..........................................................................................
संगमनेर विधानसभा 2014 मध्ये पडलेली मत
बाळासाहेब थोरात (काँग्रेस) १०३५६४
जनार्दन आहेर (शिवसेना) ४४७५९
राजेश चौधरी (भाजप) २५००७
...........................................................................................................................................................................................................
शिर्डी विधानसभा मतदार संघ....
शिर्डी विधानसभा मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे..मागील निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील मोदी लाटेतही सत्तर हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले..शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा त्यांनी पराभव केला होता..विखे पाटील आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत....विखे पाटलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलां विरोधात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचं नाव सध्या चर्चेत आहे...सत्यजित तांबे यांनी शिर्डी विधानसभेच्या उमेदवारीसाठी मुलाखतही दिली. शिर्डी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांसमोर कडवं आव्हान देण्यासाठी तांबेची निवड करण्यात आली आहे..मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी शिर्डी मतदारसंघात पूर्णत: खिळखिळी झाल्याने विखेंचं पारड जड असल्याचं सांगण्यात येत आहे.मागील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले यावेळी भाजप शिवसेना युती झाली तर ही जागा शिवसेनेकडे असल्याने विखे पाटील तिकीट मिळवण्यासाठी यातून कसा मार्ग काढतात ते पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे..युती झाली नाही तर मात्र विखेंसमोर शिवसेनेचंही मोठं आव्हान असेल....
शिर्डी_मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न....
साईबाबा संस्थानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याची मागणी....
शिर्डीतील वाढलेली गुन्हेगारी....
कोणतेही मोठे उद्योग नसल्याने बेरोजगारीची वाढती समस्या....
निळवंडे लाभधारकांना हक्काचं पाणी मिळण्यासाठी अपूर्ण कालव्यांची कामे मार्गी लावणे.....
शिर्डीतील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन प्रकल्प.....
शिर्डी विमानतळ येथे सुविधा उपलब्ध करुन देणे....
................................................................................
शिर्डी विधानसभा 2014 मध्ये पडलेली मत
राधाकृष्ण विखे पाटील (कॉंग्रेस) - 1 लाख 21 हज़ार 459 मते
अभय दत्तात्रय शेळके पाटील ( शिवसेना ) - 46 हजार 797 मते
राजेंद्र गोदकर पाटील ( भाजप) - 17 हजार 283 मते
...........................................................................................................................................................................................................
कोपरगाव_विधानसभा मतदारसंघ....
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांची परंपरागत लढत आहे..कधी कोल्हे तर कधी काळेंकडे सत्ता राहिली..तिसरी शक्ती उदयास येऊ द्यायची नाही असं जणू समीकरणच बनलं आहे. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पक्ष स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत होते.. 35 वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव कोल्हेंना तीनदा मंत्रीपद मिळाले. 2004 साली शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपीनदादा कोल्हे यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असल्याने अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली 2004 आणि 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून अशोक काळे दोन टर्म आमदार राहिले
त्यानंतर 2014 मध्ये अशोक काळेंनी निवृत्ती घेत त्यांचे पुत्र आशुतोष काळे यांना उमेदवार म्हणून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला....2014 च्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी मुलाऐवजी त्यांच्या सूनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली..राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकीटावर सौ. कोल्हे यांनी निवडणूक लढवली आणि 20 हजार मतांनी त्या विजयी झाल्या..मागील निवडणुकीत सर्वच पक्ष स्बवळावर लढले..मात्र यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीविरोधात भाजपा शिवसेना युतीचा उमेदवार समोरासमोर असेल असं चित्र सध्या तरी आहे....युतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील जर युती झाली नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे हे शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहेत..वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिला तर निवडणूक आणखीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत....
...........................................................................................................................................................................................................
कोपरगाव_मतदार संघातील महत्वाचे प्रश्न....
कोपरगाव शहराची आर्थिकदृष्टया उद्धवस्त झालेली बाजारपेठ सक्षम करणे...
रोजगाराला चालना देणे...
शहराचा जटील झालेला पाणीप्रश्न...
गोदावरी कॅनॉल रुंदीकरण...
ग्रामीण भागातील रस्त्यांची दूरावस्था...
......................................................................................................
कोपरगाव विधानसभा 2014 मध्ये पडलेली मत
स्नेहलता बिपीन कोल्हे ( भाजपा ) 99773 विजयी
आशुतोष अशोक काळे ( शिवसेना ) 70493
.........................................................................................................................................................................................................................................................................................
श्रीरामपूर_विधानसभा मतदारसंघ.....
काँग्रेससचे भाऊसाहेब कांबळे हे विद्यमान आमदार आहेत...श्रीरामपुर तालुका हा ऊस आणि कांदा उत्पादकांचा तालुका जिल्हा मुख्यालयास लागणाऱ्या सर्व इमारती तालुक्यात आहेत...श्रीरामपूरला स्वतंत्र आर टी ओ आणि अप्पर जिल्हा पोलीस कार्यालय आहेत...जिल्ह्याच्या दृष्टीने हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था तसेच रेल्वेची उपलब्धता आहे...अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर हा जिल्हा व्हावा अशी मागणी सातत्याने पुढे येत असते अपवाद वगळता श्रीरामपूरचं राजकारण हे आदिक, मुरकुटे आणि ससाणे या गटांभोवतीच फिरत राहिलं आहे. दिवंगत आमदार आणि साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जयंतराव ससाणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जायचं. जयंत ससाणे हे गोविंदराव आदिक आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या तालमीत वाढलेले. 1999 साली राष्ट्रवादी स्थापन झाली आणि जयंत ससाणे यांनी राष्ट्रवादीचे त्यावेळचे उमेदवार भानुदास मुरकुटे यांचा अवघ्या 500 मतांनी पराभव केला...त्यानंतर ससाणे 2004 सालीही आमदार झाले...2009 साली हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आणि ससाणे समर्थक भाऊसाहेब कांबळे हे सलग दोनवेळा आमदार झाले....जयंत ससाणे यांच्या निधनानंतर राजकीय गणित बदलली आहेत..लोकसभा निवडणुकीत थोरातांनी ससाणे आणि विखे समर्थक भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. लोकसभा निवडणुकी दरम्यान डॉ. सुजय विखे भाजपात गेले...राधाकृष्ण विखे पाटलांनी कॉग्रेस ऐवजी शिर्डी लोकसभेत कांबळे यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा जाहिर प्रचार केला...थोरातांनी जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे याला काँग्रेस जिल्हाध्यक्ष केलं होतं. मात्र आठ दिवसात विखेंच्या सांगण्यावरून करण ससाणे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत ससाणेंना जवळ करण्यात यश मिळवलं....श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघावर विखे पाटलांनी पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत केलं आहे...भाऊसाहेब कांबळे,माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच सदाशिव लोखंडे हे आपल्या मुलासाठी या मतदारसंघातून इच्छुक आहेत...वंचित बहुजन आघाडीची ताकदही या मतदारसंघात मोठी आहे...वंचितने जिल्ह्यातील सर्व 12 जागा लढवण्याची तयारी केली आहे...त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत....लोकसभा निवडणुकीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांना 21 हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे हीच परिस्थिती विधानसभेत राहिली तर काँग्रेसची अडचण वाढू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूरचे राजकारण शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याभोवती फिरत आहे. त्यामुळे यावेळी श्रीरामपूरकर कोणाच्या पारड्यात मते टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.....
श्रीरामपुर_मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न....
शेतीसाठी पाणी...
अहमदनगर जिल्हयाचं विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा...
वाढती गुन्हेगारीची समस्या...
रस्ते ग्रामीण भागात पिण्याच पाणी...
.............................................................................................................................................
श्रीरामपूर विधानसभा 2014 मध्ये पडलेली मत
भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) ५७११८
भाऊसाहेब वाकचौरे (भाजप) ४५६३४
...........................................................................................................................................................................................................
नेवासा_विधानसभा मतदारसंघ....
भाजपचे बाळासाहेब मुरकुटे हे विद्यमान आमदार आहेत...नेवासा ही संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासे हे गाव आहे...याच गावात राहून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली नेवासा तालुका २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आहे. यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता...राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा तालुका असून अलीकडे भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचेही बळ वाढताना दिसत आहे. मारुतराव घुले , यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे....सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरली आहे...गोदावरी,प्रवरा आणि मुळा या तीन नद्यांचा संगमही याच तालुक्यात होतो ज्याला प्रवरासंगम म्हणून ओळखलं जातं संत ज्ञानेश्वर मंदिर मोहिनीराज मंदिर देवगड देवस्थान तसेच शनिदेवाचं स्वयंभू स्थान असलेलं शनिशिंगणापूर अशी महत्वाची धार्मिक स्थळे आहेत....माजी खासदार यशवंतराव गडाख यांचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे मुळा सहकारी साखर कारखाना मुळा एज्युकेशन सोसायटी मुहूर्तमेढ यशवंतराव गडाख यांनीच रोवली ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती असो की स्थानिक संस्था यावर गडाखांचं प्राबल्य दिसून येतं शनि शिंगणापूर देवस्थानावरही विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणून गडाखांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लागली....हा तालुका कायम विद्रोही विचाराचा आणि परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो.पूर्वी शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदारसंघ असताना सुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही...तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करुन वकिलराव लंघे पाटील यांच्या सारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोन वेळा आमदार केलं. त्यानंतर लंघे यांचा पराभव करुन 10 वर्ष काँग्रेसचे संभाजीराव फाटके हे आमदार राहिले. त्यानंतरच्या निवडणुकीत मारुतराव घुले यांचा पराभव करुन अपक्ष तुकाराम गडाख 1995 साली तुकाराम गडाखांचा पराभव करुन पांडुरंग अभंग हे आमदार झाले त्यनंतर 1999 आणि 2004 राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले हे दोन टर्म आमदार राहिले 2009 साली नेवासा मतदारसंघ स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आणि यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख मतदारसंघाचे प्रतिनीधी झाले....2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात गेलेले बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाखांवर चार हजार 652 मतांनी निसटता विजय प्राप्त केला....राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याने शंकराव गडाख यांनी राष्ट्रवादीला निवडणुकीनंतर सोडचिठठी दिली शेतकरी क्रांतीकारी पक्षाची स्थापना करत शंकरराव गडाख यांनी सवता सुभा मांडला त्यामुळे नेवासा तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीकडून विठ्ठलराव लंघे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत...तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीही विजयाची समिकरणे बिघडवू शकते. लोकसभा निवडणुकीत वंचितचे संजय सुखदान यांनी चांगली मते मिळवली होती...संजय सुखदान नेवासा येथील असल्याने त्यांचंही नाव चर्चेत आहे....
...........................................................................................................................................................................................................
नेवासा_मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न –
गावांच्या पिण्याच्या पाणी योजनेच रखडलेलं काम...
रस्ते आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न...
करोडो रुपयांचा अखर्चित निधी...
धार्मिक पर्यटन विकासाला चालना
................................................................................................................
नेवासा विधानसभा 2014 मध्ये पडलेली मत
बाळासाहेब मुरकुटे ( भाजपा ) 84361 विजयी
शंकरराव यशंवंतराव गडाख ( राष्ट्रवादी काँग्रेस ) 78565
...........................................................................................................................................................................................................
अकोले_विधानसभा मतदारसंघ....
अकोले विधानसभा मतदार संघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने अनुसूचित जातीकरिता एसटी राखीव असलेला मतदारसंघ....सह्याद्रीच्या पर्वतरांगा भंडारदरा धरण महाराष्ट्रातील अतिउच्च शिखर कळसुबाई निसर्गाने नटलेला हरिषचंद्र गडाचा परिसर अनेक एतिहासिक स्थळे आणि मंदिरे भंडारदरा निळवंडे या मोठ्या धरणांसह अनेक छोट्या धरणांचा समूह आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका अकोले विधानसभा मतदारसंघ मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला सुरुवातीपासून काँग्रेसचा गड मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पिचड राष्ट्रवादीसोबत राहिले. तेव्हापासून आत्तापर्यंत अकोले राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला...मधुकर पिचड यांची अनेक वर्ष आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिलं या काळात पिचड परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले...पर्यटन स्थळांचा विकास...आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात आग्रही तसेच अनेक छोट्या धरणांची निर्मिती पिचडांनी तालुक्यात केली. अगस्ती सहकारी साखर कारखाना अमृतसागर दूध संघ नगरपरिषद तसेच अनेके ग्रामपंचायती पिचडांच्या अधिपत्याखाली आहेत...2014 साली मधुकर पिचडांनी आपले पुत्र वैभव पिचड यांचेवर आमदारकीची जबाबदारी सोपवली. वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत 20 हजारांच्या मताधिक्याने शिवसेनचे मधुकर तळपाडे यांचा पराभव केला. भाजप शिवसेना स्वतंत्र लढल्याने झालेलं मताचं विभाजन पिचडांच्या पथ्यावर पडलं. नुकतंच पिचड पुत्रांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नावाला शिल्लक राहिली आहे...दुसरीकडे भाजपचे अशोक भांगरे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे तसेच शिवसेनेचे नेते आणि पंचायत समिती उपसभापती मारूती मेंघाळ यांनी एकत्र येत पिचडांविरोधात दंड थोपटले आहेत....डॉ.किरण लहामटे यांनी पिचडांचा भाजप प्रवेश होताच राष्ट्रवादीच्या गोटात जाण्याचा पावित्रा घेतला. अजित पवारांची त्यांनी भेटदेखील घेतली. सध्या हे तीनही विरोधक पिचडांना एकास एक उमेद्वार देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मनोमिलन झालं तर वैभव पिचडांसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे....
.........................................................................................................................................................................................................................................................................................
अकोले _मतदार संघातील महत्वाचे प्रश्न....
पर्यटन विकास...
तालुक्यातील रस्ते...
आश्रम शाळेंची झालेली दुरावस्था...
कळसूबाई हरिषचंद्र गडाला जाणारे दयनिय रस्ते आणि अपु-या सुविधा...
आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्न. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना...
.........................................................................................................................
अकोले विधानसभा 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणकीच आकडे वारी
वैभव पिचड (राष्ट्रवादी) - 67, 696 (विजयी)
मधूकर तळपाडे, (शिवसेना) - 47,634
अशोक भांगरे, भाजपा - 27,446
Conclusion: