ETV Bharat / state

दिवाळीपर्यंत साई मंदिर खुले करा, अन्यथा दिवाळीनंतर न्यायालयात याचिका दाखल करणार - खासदार सुजय विखे - शिर्डी साूईबाबा मंदिर सुरू बातमी

साई मंदिर खुले करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

MP Sujay Vikhe patil
खासदार सुजय विखे
author img

By

Published : Nov 5, 2020, 3:44 PM IST

Updated : Nov 5, 2020, 4:44 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - राज्यातील मंदिरे खुले करावेत ही मागणी घेऊन भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. शिर्डीचे साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, यासाठी भाजपकडून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, राज्य सरकार साई मंदिर खुले करण्यासाठी कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळे आता साई मंदिर खुले करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

सुजय विखे पाटील - खासदार

हेही वाचा - 'मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोराला सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे...'

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून आता चित्रपटगृह आणि जलतरण तलावही खुले करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मंदिर उघडण्याबाबत अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता दिवाळी काही दिवसांवर आली असताना आता तरी सरकारने दिवाळीला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, अन्यथा दिवाळीनंतर शिर्डी ग्रामस्थांबरोबर शिर्डीत एक बैठक घेऊन ग्रामस्थ यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज शिर्डीत सांगितले आहे.

हेही वाचा - आजपासून ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू होणार

Last Updated : Nov 5, 2020, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.