ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे 'द्विशतक', आज नऊ नवे रुग्ण - अहमदनगर कोरोना न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात आज नऊ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकूण आकडा 204 वर पोहोचला आहे.

government hospital ahmednagar
अहमदनगर जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Jun 6, 2020, 2:23 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 9 नवीन आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दोनशे पार गेली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या 204 इतकी झाली आहे. तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अहमदनगर शहरात तीन रुग्ण, पाथर्डी येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते चेंबूर (मुंबई) येथून प्रवास करुन आले आहे. राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील एक युवक बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. संगमनेर शहरातील एक संपर्कात आलेली व्यक्ती. लांडे वस्ती शेवगाव येथील मुंबईहून प्रवास करुन आलेला एक युवक तर शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे कळवा (ठाणे) येथून प्रवास करुन आलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

हेही वाचा - देश पातळीवर 'न्याय' योजनेच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस आजही आग्रही - बाळासाहेब थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.