ETV Bharat / state

2022 पर्यंत निळवंडेच्या कालव्यांद्वारे दुष्काळी भागात पाणी पोहोचवणार - महसूलमंत्री

2022 पर्यंत दुष्काळी भागात कालव्यांद्वारे पाणी देण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

balasaheb thorat
balasaheb thorat
author img

By

Published : Mar 21, 2021, 7:16 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - 1999 मध्ये प्रथम मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपण निळवंडेच्या कामाला गती दिली. सातत्याने पाठपुरावा करून 2012 पर्यंत भिंतीचे काम पूर्ण केले. याच काळात बोगद्याची कामेही मार्गी लावली. मागील पाच वर्षे काम थांबले होते. आता पुन्हा महाविकास आघाडी सत्तेवर येताच दुसर्‍या दिवसापासून कालव्यांच्या कामाला गती दिली. चालू अर्थसंकल्पात भरीव निधी मंजूर केला असून अजूनही निधी उपलब्ध करून देणार आहे. 2022 पर्यंत दुष्काळी भागात कालव्यांद्वारे पाणी देण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 5500 मेट्रिक टन क्षमतेच्या कारखाना व 30 मेगावॅट वीज निर्मितीचा हा निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा ठरला आहे. यावर्षी सर्वत्र ऊस जास्त प्रमाणात उपलब्ध असून कारखान्याने 10 लाख मेट्रिक टनाच्यापुढे गाळप केले आहे. विद्युत प्रकल्पातून हि कारखान्याला चांगले उत्पादन होत असून नव्याने सुरू केलेला इथेनॉल प्रकल्पात मुळे कारखान्याच्या उत्पादनात भर पडणार आहे. कारखान्याची वाटचाल चांगली असून अधिक कार्यक्षमतेने काम करताना हा लौकिक यापुढेही असाच राहील. तसेच सभासदांनी हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करावा. या सहकारी संस्थांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद झाला आहे. निळवंडे धरण आपल्या जिवनाचे ध्येय मानून पूर्ण केले. 2012 पर्यंत भिंतीसह कालव्यांची कामे मार्गी लावली. 2014 ते 2019 या कालखंडामध्ये अतिशय संथगतीने काम सुरू होते. कालव्यांच्या कामावर अवघे 2-3 पोकलँड काम करत होते. मात्र महाविकास आघाडी सत्तेवर येताच आपण दुसर्‍या दिवसापासून कामाला पुनश्च गती दिली. ३५-४० पोकलँडने काम सुरू केले. मागील वर्षी कोरोनाची संकट आले.

मजुरांचा प्रश्‍न उद्भवला. अशा काळात जास्तीत जास्त लक्ष देऊन 0 ते 28 ची कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी काम केले. विविध ठिकाणी स्ट्रक्चरचे काम सुरू आहे. या वर्षी चालू अर्थसंकल्पातून चांगला निधी मिळवला. कमी पडल्यास आणखीही निधी मिळवणार आहोत. हे काम पूर्ण करून 2022 पर्यंत लवकरात लवकर कालव्यांद्वारे पाणी देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. या प्रश्नामध्ये आपण कधीही राजकारण केले नाही. जे राजकारण करतात त्यांना महत्त्व देऊ नका हा पाण्याचा प्रश्न आहे. याच बरोबर अहमदनगर जिल्हा बँक ही सर्व संस्थांची मातृसंस्था आहे .या बँकेने शेतकर्‍यांच्या जीवनात मोठे आनंद निर्माण केला आहे. या बँकेला आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची असून सर्व कारखान्यांचा सभासदांनी व कर्जदारांनी वसुली नियमित देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. तसेच वीज थकबाकी बाबत शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. तालुक्यातील थकबाकी पूर्ण केल्यास येथील इन्फ्रास्ट्रक्चर साठी मोठी मदत परतावा मधून मिळणार आहे. म्हणून ही थकबाकी आपण शुन्य टक्के करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे सांगताना महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना 50 हजार रुपये व दोन लाखांपर्यंत कर्ज माफीसाठी दिलेल्या शब्द हे सरकार पूर्ण करणार आहेत त्यामुळे कोणीही संभ्रमावस्था निर्माण करू नये असेही ते म्हणाले.

यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्वावर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्यासह येथील सहकारी संस्था काम करत आहेत. आज संगमनेरचा सहकार देशात मॉडेल ठरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.