अहमदनगर - जिल्ह्याचे पोलीस अधिक्षकपद मागील सहा महिन्यांपासून रिक्त होते. अखिलेशकुमार सिंह यांची अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नुकतीच नियुक्ती झाली. अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली.

जिल्ह्यात नव्याने आलेले जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक हे पदभार घेतल्यानंतर अलिखित रिवाजाप्रमाणे आवर्जून समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतात. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्यापासून अण्णा आपल्या खोलीतच आहेत. अण्णांनी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांना जिल्ह्यात चांगल्या कामकाजाची अपेक्षा ठेवत शुभेच्छा दिल्या.