ETV Bharat / state

Sai Baba Temple Shirdi : साईबाबा संस्थानची नवीन नियमावली जाहीर; वाचा काय सुरू, काय बंद - शिर्डी साईबाबा मंदिर

साईबाबांच्या दर्शनासाठी आता नवीन नियमावली जाहीर केली आहे. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत या कालावधीत भाविकांना साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. तसेच साईबाबांच्या मंदिरा बरोबर साईबाबांचे साई प्रसादालय आणि लड्डू प्रसादही रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

Saibaba
साईबाबा
author img

By

Published : Dec 26, 2021, 12:42 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात रात्रीची संचारबंदी लागु केली आहे. याच पार्श्वभूमीवर साई संस्थानने देखील खबरदारी घेत साईबाबांच्या दर्शनासाठी आता नवीन नियमावली जाहीर केली आहे. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत या कालावधीत भाविकांना साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. तसेच साईबाबांच्या मंदिरा बरोबर साईबाबांचे साई प्रसादालय आणि लड्डू प्रसादही रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

साईबाबा संस्थानची नवीन नियमावली जाहीर

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री भाविकांची साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात रात्रीची संचारबंदी लागु केली आहे. याच पार्श्वभूमीवर साई संस्थाने देखील नवीन नियमावली जाहीर केली असल्याने यंदाचा वर्षी 31 डिसेंबर रोजी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुल ठेवण्यात येणार नाहीत. नाताळ आणि नवीन वर्षा निमित्ताने भाविकांची आज शिर्डीत मोठी गर्दी झाली असुन साई स़स्थांनकडुन दर्शन रांगेत दोन भाविकांना मधील अंतर राखण्यासाठी सिंगल लाईन सिस्टम सुरु करण्यात आली आहे. याच बरोबरीने वाढती गर्दी लक्षात घेता. साई मंदिरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. दर्शन रांगेत भाविकांची कडक तपासणी करण्या बरोबरच स्क्रीनींग केली जात आहे.

साई संस्थानची नवीन नियमावली जाहीर -

काय सरू?

  • सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना मिळणार साई दर्शन
  • साई मंदिरातील मोजक्या पुजाऱ्यांचा उपस्थिती होणार रात्रीची शेजारती आणि पहाटेची काकड आरती
  • साईबाबा संस्थानचे साई प्रसादलाय आणि लाड्डू प्रसाद सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत राहणार सुरू
  • साईबाबांच्या मंदिरा जाणाऱ्या दर्शन लाईन मध्येही बदल

काय बंद?

  • रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी राहणार बंद
  • साईबाबांच्या मंदिरात रात्री 10 वाजता होणारी शेजारती आणि पहाटेची काकड आरतीसाठी भाविकांना मंदिरात प्रवेश बंद
  • साईबाबा संस्थानचे साई प्रसादलाय आणि लाड्डू प्रसाद रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार बंद
  • 31 डिसेंबर रोजी रात्रभर खुल राहणार साई मंदिर यंदाच्या वर्षी राहणार बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.