अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मधून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी इच्छुक म्हणून रोहित पवारांनी उमेदवारी मागितली आहे.
लोकशाही पद्धत असून पक्ष सर्व कार्यकर्त्यांना समान संधी
अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी भवनात आज राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. रोहित पवार इच्छुक असलेल्या जामखेड-कर्जत मतदारसंघात रोहित यांच्या सह एकूण तीन उमेदवारांनी मुलाखती दिल्या. ही लोकशाही पद्धत असून पक्ष सर्व कार्यकर्त्यांना समान संधी देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पक्ष जो आदेश देईल तो पाळू
रोहित पवार यांनी मी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी पक्ष निरीक्षकांकडे उमेदवारी मागितली आहे आता पक्ष जो आदेश देईल तो पाळू, मात्र एकसंघपणे लढत दिल्यास निश्चित हा मतदारसंघ आपण जिंकू शकतो, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, अंकुश काकडे आदी निरीक्षकांनी यावेळी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. रोहित यांच्यासह एकूण तीन उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यामुळे आता पक्षाकडून कोणाला टिकीट दिले जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.