ETV Bharat / state

कमावलेल्या पैशातून मंत्र्यांनी कोविड सेंटर उभारावे; डॉ. सुजय विखेंचा खोचक सल्ला

औषध मिळत नाही, असे ओरडत बसण्याऐवजी कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा, असा खोचक टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना आणि विशेषतः मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला आहे.

सुजय विखे
सुजय विखे
author img

By

Published : Apr 24, 2021, 9:13 PM IST

अहमदनगर - रेमडेसिवीर मिळत नसल्यामुळे मी विमानाद्वारे 15 लाख खर्च करून 2 हजार इंजेक्शन आणले. ते इंजेक्शन जिल्हा रुग्णालय, साईबाबा संस्थान रुग्णालय, प्रवरा रुग्णालय तसेच रूग्णांपर्यंत पोहोचवले, तेही राज्यात आमची सत्ता नसताना. त्यामुळे औषध मिळत नाही, असे ओरडत बसण्याऐवजी कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा, असा खोचक टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना आणि विशेषतः मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला आहे.

शनिवारी खासदार विखे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा, कोळगाव, घारगाव, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, मढेवडगाव येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी लोणीव्यंकनाथ येथील बाळासाहेब नाहटा यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटर मध्ये प्रसारमध्यमांशी बोलताना वरील टोला लगावला.

जिल्ह्यातील नेत्यांनी पुढाकार घ्यावा -

जिल्ह्यात अनेकांनी शासकीय मदत घेऊन कोविड सेंटर सुरू केले. पण बाळासाहेब नाहटा यांनी पुढे येऊन स्वखर्चाने सेंटर सुरू केले. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी नाहटा यांचा आदर्श घ्यावा. इतर सेंटरला ऑक्सिजन सिलेंडरची अडचण असताना नाहटा यांनी सिलेंडर पुरवले याचेही त्यांनी कौतुक केले. श्रीगोंदा तालुक्यात ठिकठिकाणी सेंटर झाले तर नगरमधील रुग्णाची गर्दी कमी होईल. प्रसंगी सेंटरला विखे यांनी 50 हजाराची मदत जाहीर केली. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब पाटील, भगवानराव गोरखे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.