ETV Bharat / state

NCP Camp in Shirdi : या दिग्गज नेत्याने शिबिराकडे फिरवली पाठ, नेत्यांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण...

author img

By

Published : Nov 5, 2022, 9:10 PM IST

शिर्डीत गेल्या दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला राष्ट्रवादीच्या दिगग्ज नेत्यांनापासून प्रकृती बरी नसलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. मात्र या शिबिराकडे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( ( NCP MP Amol Kolhe ) ) यांनी पाठ फिरवली असल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झळकले आणि आज अचानक ते आपल्या आजोळी निघून गेले, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

Etv Bharat
Etv Bharat

अहमदनगर : शिर्डीत गेल्या दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला राष्ट्रवादीच्या दिगग्ज नेत्यांनापासून प्रकृती बरी नसलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. मात्र या शिबिराकडे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( ( NCP MP Amol Kolhe ) ) यांनी पाठ फिरवली असल्याचे पहायला मिळत आहे.तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झळकले आणि आज अचानक ते आपल्या आजोळी निघून गेले, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

पक्षाच्या कार्यपद्धतीवर कोल्हे नाराज - साईबाबांच्या शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काल पासुन दोन दिवसीय मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते हजर आहेत. मात्र राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांनी मंथन शिबिराकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खासदार डॉ. अमोल कोल्हे हे मंथन शिबिरात हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती या विषयावर बोलणार होते. मात्र वेळेअभावी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी होती. तसेच पक्षाच्या कार्यपद्धतीवरही कोल्हे नाराज असल्याची माहिती आहे. यामुळे कोल्हे यांनी या शिबिराकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार आजोळी निघून गेल्याच्या चर्चा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवारही शिबिराच्या शेवटच्या दिवशी फारसे सक्रीय नव्हते. अचानक ते आपल्या आजोळी निघून गेले, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. जयंत पाटील यांच्या भाषणाच्यावेळीही अजित पवार गैरहजर होते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही पक्षाच्या अधिवेशनात जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच अजित पवार सभागृहाबाहेर पडल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र तेव्हा आपण वॉशरूमला गेल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले होते. मात्र आज शिर्डीतील अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गैरहजेरीच्या चर्चेबाबत त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची हजेरी - नुकतेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांना प्रकृती बरी नसल्यामुळे मुंबई येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज थेट मुंबईतील रुग्णालयातुन आजारी असतानासुद्धा त्यांनी शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा शिबिरासाठी शिर्डीत हजेरी लावली. मात्र अमोल कोल्हेंनी या शिबिराकडे पाठ फिरवली तर दुसरीकडे आज शिबिराच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार अचानक निघुन गेल्याने अनेक चर्चाने उधाण आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.