शिर्डी (अहमदनगर) - आई कुठे आहे ग तु..का सोडुन गेलीस आम्हाला या जंगलात.. ही कुठल्या चित्रपटाची कहानी नाही तर सत्य घटना आहे. अकोले तालुक्यातील परतनदरा वाडीच्या जंगलात नंदिनी सोनवणे (वय 7) व तिचा भाऊ सिद्धांत (वय 5) या दोघांना आई सोडून गेली असून वडील ज्ञानदेव मजुरीला जात असल्याने दोन चिमुकली प्लास्टिकच्या झोपडीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तर पाहुया ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..
या दोन चिमुकल्यांची आई तीन वर्षापूर्वी या बाळांना सोडून गेली. तिला एका व्यक्तीने फुस लावून आपल्या पती व मुलापासून तोडून अकोले तालुक्यातील ओतूर परिसरात नेले आहे. याबाबत पती ज्ञानदेवने अकोले पोलिसाना तक्रार देऊनही त्याला दाद दिली नाही. शेवटी आलिया भोगासी असावे सादर म्हणत त्याने कळंब येथील जंगलात जिथे चिट पाखरू नाही मात्र तरस, कोल्हे,बिबटे यांचा अधिवास असलेल्या ठिकाणावर त्याने एका साब्रीच्या जंगलात मध्यभागी झोपडी बांधून आपल्या दोन मुलासह राहत आहे.
आईच्या विरहात जंगलातील झोपडीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत दोन चिमुकले बहीण-भाऊ
अकोले तालुक्यातील परतनदरा वाडीच्या जंगलात दोन चिमुकली बहीण-भाऊ वडिलांसोबत राहतात. आई दोघांना सोडून गेली असून वडील ज्ञानदेव मजुरीला जात असल्याने दोन चिमुकली प्लास्टिकच्या झोपडीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तर पाहुया ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..