ETV Bharat / state

अहमदनगर : बुधवारी आणखी ५ जणांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या शंभरीच्या उंबऱ्यावर - अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट

बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात आणखी ५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरुन आलेल्या एकूण बाधितांची संख्या ९९ च्या घरात पोहोचली आहे. दरम्यान, परजिल्ह्यातून येणाऱ्यांनी स्वत:ला विलगीकरण करून घ्यावे, असेआवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

अहमदनगर कोरोना
अहमदनगर कोरोना
author img

By

Published : May 28, 2020, 7:39 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यात बुधवारी आणखी 5 कोरोनाबाधित व्यक्तींची भर पडली आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून जिल्ह्यात आलेल्या अशा एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 99 झाली आहे. दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे. तसेच सार्वजनीक संपर्क टाळावा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह व इतर आजार आहेत. त्यांनी सर्दी, खोकला किंवा इतर आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये 54 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या 5 व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यात घाटकोपर येथून टाकळीमिया राहुरी येथे आलेली 35 वर्षीय महिला, भिवंडी येथून नगर शहरातील दातरंगे मळा येथे आलेला 60 वर्षीय व्यक्ती, ठाणे येथून पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडे येथे आलेला 46 वर्षीय व्यक्ती, घाटकोपर येथून पिंपळगाव अकोले येथे आलेली 66 वर्षीय महिला आणि राहता तालुक्यातील शिर्डी जवळील निमगाव येथील 55 वर्षीय महिला यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 2 हजार 153 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासले असून त्यापैकी 2 हजार 11 निगेटिव्ह आले आहेत. तर, 15 स्त्राव नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही. सध्या 33 जण उपचार घेत असून तीन जण नाशिक येथे उपचार घेत आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.