ETV Bharat / state

पुत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा वाद; इंदुरीकर महाराजांच्या भेटीला मनसे नेते अभिजीत पानसे - मनसे नेते अभिजीत पानसेंनी घेतली इंदुरीकर महाराजांची भेट

इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून पुत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा संदर्भ दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आणि समर्थनात अनेक जण उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी आज संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील इंदुरीकर महाराज यांच्या घरी त्यांची भेट घेतली. सुमारे अर्धातास बंद खोलीआड दोघांमध्ये चर्चा झाली.

ahmednagar
मनसे नेते अभिजीत पानसे
author img

By

Published : Jul 11, 2020, 5:01 PM IST

अहमदनगर - प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून पुत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा संदर्भ दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आणि समर्थनात अनेक जण उतरले आहेत. आता महारांजाविरोधात संगमनेर सत्र न्यायालयात गुन्हा दाखल होऊन न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. तर दुसरीकडे इंदुरीकर महाराजांना समर्थन देणे सुरूच आहे. आज मनसे नेते अभिजीत पानसे यांनी इंदुरीकर महाराजांची भेट घेतली आहे.

पूत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा वाद; इंदुरीकर महाराजांच्या भेटीला मनसे नेते अभिजीत पानसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी आज संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील इंदुरीकर महाराज यांच्या घरी त्यांची भेट घेतली. सुमारे अर्धातास बंद खोलीआड दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला गेला नसला, तरी मनसे इंदुरीकरच्या पाठीशी उभी राहाते का, हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. इंदुरीकर महाराजांच्या भेटीनंतर पत्रकारांना बोलताना पानसे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. एखाद्या छोट्या चुकीची दिलगिरी इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे चांगले कार्य घडत आहे. त्यांनी स्वत:ची शाळा काढली आहे. त्यांचे हे मोठे कार्य आपण विसरणार आहोत का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुत्रप्राप्ती विषयी आपल्या कीर्तनात वक्तव्य केल्याचा आरोप इंदुरीकरांवर आहे. संगमनेर कोर्टात त्यांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल आहे. इंदुरीकरांवरील गुन्हा मागे घ्यावा, या मागणीस्तव अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांनी नुकतेच तहसीलदारांना निवेदन दिले होते. इंदुरीकरांच्या समर्थनार्थ पिचड सरसावले, आता मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी भेट घेतल्यामुळे मनसेही इंदुरीकरांच्या पाठीशी उभी राहाते का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत झोळेकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सचिव डॉ. संजय नवथर, सरचिटणीस तुषार बोंबले आदी उपस्थित होते.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.