ETV Bharat / state

मंदिरं उघडण्यासाठी भाजपपाठोपाठ आता मनसेही आक्रमक, साई मंदिरासमोर मनसेचे आंदोलन - शिर्डी साई मंदिर बातमी

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भापजपाठोपाठ आता मनसेही आक्रमक झाली असून आज मनसेच्या वतीने शिर्डी साई मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. 'आम्ही कुलूप तोडूनही मंदिरात जाऊ शकलो असतो. मात्र, साईंनी दिलेला 'श्रद्धा आणि सबुरी'चा संदेश आम्ही पाळतोय असे मनसे नेते बाळा नांदगावर यावेळी म्हणाले.

साई मंदिरासमोर मनसेचे आंदोलन
साई मंदिरासमोर मनसेचे आंदोलन
author img

By

Published : Sep 13, 2020, 4:14 PM IST

अहमदनगर : शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांच्या दर्शानासाठी उघडण्यासाठी भाजप पाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे. शनिवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिर्डीत येऊन साई मंदिराच्या चार नंबर प्रवेश द्वारासमोर मंदीराच्या कलशाला साष्टांग दंडवत घालत साईबाबांनीच राज्य सरकारला मंदिरे उघडण्याची सद्बुद्धी द्यावी असे साकडे घातले.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी मनसे आंदोलन करत आहे. शनिवारी शिर्डीचे साईबाबा मंदिर उघडण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानुसार मनसे कार्यकर्ते शिर्डीत जमले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही बंदोबस्त तैनात केला होता. मनसे नेते बाळा नांदगावकरांनी शिर्डीत येऊन साईच्या श्रध्दा सबुरीचा संदेश पाळत साई मंदिराच्या चार नंबर प्रवेश द्वारासमोर जाऊन मंदीराच्या कळसाला साष्टांग दंडवत घालत सरकारला मंदिरे उघडण्याची सद्बुद्धी द्यावी, असे साकडे घातले.

साई मंदिरासमोर मनसेचे आंदोलन

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही कुलूप तोडूनही मंदिरात जाऊ शकलो असतो. मात्र, साईंनी दिलेला 'श्रद्धा आणि सबुरी'चा संदेश आम्ही पाळला आहे. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे तसेच उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याबरोबर साई मंदिर उघडण्याबाबत चर्चा केली. साई संस्थानच्या वतीने साई मंदिर उघडण्याची संपूर्ण तयार झाली आहे. मंदिरात एका तासात 400 भाविकांना साई दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे. यामुळे आता राज्य सरकारने साई मंदिर उघडण्याचे आदेश संस्थानला द्यावे, अशी मागणी यावेळी नांदगावकर यांनी केली.

हेही वाचा - अहमदनगर : इंटरनेटसह टॉवर नसल्याने दहा गावांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर 'टाळेबंदी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.