ETV Bharat / state

एमपीएससी सदस्यांची यादी राज्यपालांकडे, विधानपरिषद सदस्यांसारखी ती यादी राज्यपालांनी रोखून ठेवू नये - रोहित पवार

author img

By

Published : Aug 3, 2021, 7:28 AM IST

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्याची घोषणा केली होती. मात्र आयोगाच्या सदस्यांची निवडच झालेली नसल्याने अगोदर या सदस्यांची निवड गरजेची असल्याने चार नावे 31 जुलैपूर्वीच राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

MLA rohit pawar on governor in Ahmednagar
एमपीएससी सदस्यांची यादी राज्यपालांकडे

अहमदनगर - उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दांचे पक्के आहेत. एमपीएससी भरतीबाबत त्यांनी दिलेले आश्वासनाच्या पूर्ततेच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चार सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे 31 जुलैपूर्वीच नावे पाठवली आहेत. मात्र, ज्या पद्धतीने बारा विधानपरिषद सदस्यांची यादी राज्यपालांनी अद्याप प्रलंबित ठेवली त्या पद्धतीने किमान एमपीएससी बाबतीत ते करणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

एमपीएससी सदस्यांची यादी राज्यपालांकडे - आमदार रोहित पवार

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार पवार यांनी विविध गावांना भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या, यावेळी आमदार पवार हे बोलत होते.

सदस्यांची निवड तातडीने करावी -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही निवडीसाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे स्वप्नील लोणकर या युवकाने कर्जाच्या तणावाखाली गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्याची घोषणा केली होती. मात्र आयोगाच्या सदस्यांची निवडच झालेली नसल्याने अगोदर ह्या सदस्यांची निवड गरजेची असल्याने चार नावे 31 जुलैपूर्वीच राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. मात्र, या सदस्य निवडीत बारा विधानपरिषद सदस्यांसारखा विलंब लागू शकतो का असे विचारले असता, आमदार पवार यांनी विधानपरिषद सदस्य निवडीतील उशिराबद्दल काहीशी नाराजी व्यक्त करतानाच राज्यपाल किमान एमपीएससी सदस्य निवडीत तसा विलंब करणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, सदस्यांची निवड तातडीने करावी अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली.

एमपीएससीचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात -

याबाबत त्यांना छेडल्यानंतर काही वेळातच आमदार रोहित पवार यांनी या विषयाला अनुषंगुण ट्विट केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाला पक्के असलेले नेतृत्व असून आयोग सदस्यांची नावे त्यांनी 31 जुलैला पाठवली असल्याची माहिती ट्विट केली. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या असून पुढील प्रक्रिया सध्या थांबलेली असताना तसेच नव्याने परीक्षा अपेक्षित असताना ही प्रक्रिया पार पडत नसल्याने नाराजीची भावना हजारो विद्यार्थ्यांत आहे. याबाबत विरोधी पक्षांनी सरकारवर टीका सुरू केली असून काही संघटना आंदोलनाच्या पावित्र्याचा आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी याबाबतचा खुलासा करताना एमपीएससीचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात ढकलला आहे.

सेनाभवना बाबतचे वक्तव्य म्हणजे लाड यांचा प्रसिद्धीचा सोस -

भाजप विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी शिवसेनाभवन तोडू असे केलेले वक्तव्य हे त्यांच्या पक्षाचे नसावे, ते लाड यांचे वैयक्तिक वक्तव्य असेल. असे वक्तव्य करून त्यांना प्रसिद्धी मिळवायची असेल असे आमदार पवार म्हणाले. अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून लोकांचे लक्ष वेधता येते आणि प्रसिद्धी मिळवता येते, कदाचित त्या हेतूने त्यांनी हे वक्तव्य केले असावे. मात्र, कोरोनाच्या संकटाच्या काळात असे वातावरण दुषित होईल असे वक्तव्ये टाळले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.