ETV Bharat / state

'विरोधक सुशांतसिंहच्या प्रकरणावरुन राजकारण करत आहेत'

कोरोना काळात मुलभूत सुविधेवर न बोलता विरोधकांकडून बिहार निवडणूक डोळ्या समोर ठेवत सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा राजकारण केले जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केले.

rohit pawar
रोहित पवार
author img

By

Published : Aug 22, 2020, 4:20 PM IST

अहमदनगर - कोरोनाच्या काळात आरोग्य, शिक्षण आदी मुलभूत प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी विरोधक अभिनेता सुशांतसिंह प्रकरणावरून राजकारण करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

कर्जत येथे कर्जत-जामखेड एकत्रित विकास संस्थेच्या वतीने दादापाटील शेळके महाविद्यालयात आयोजित ऑनलाईन शाळा अॅपबाबत आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी आमदार रोहित पवार बोलत होते.

यावेळी त्यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप केला. सरकार म्हणून महाविकास आघाडी कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य, ऑनलाईन शिक्षण या मूलभूत आणि गरज बनलेल्या गोष्टीवर काम करत असताना यावर बोलण्याऐवजी विरोधक बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत आहेत. मात्र, हे राजकारण करत असताना भाजपकडून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याबाबत दुजाभाव केला जात आहे, हे योग्य नसल्याचेही आमदार पवार म्हणाले.

पार्थचे 'ते' व्यक्तिगत मत
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवताच पार्थ पवार यांनी, 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले होते. या ट्विटचा काय अर्थ आहे, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांना केला असता त्यांनी, एखादे वक्तव्य, ट्विट हे ज्याचे-त्याचे वैयक्तिक मत अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला असल्याचे निदर्शनास आणले. मुंबई पोलिसांवर कसलेही आरोप न्यायालयाने केलेले नाहीत. उलट सुशांत प्रकरणात भरपूर राजकारण होत असल्याने तपास सीबीआयकडे दिला गेला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचे सांगत आमदार पवार यांनी भाजपने केलेले राजकारण यास कारणीभूत असल्याचा दावा केला.

हेही वाचा - विजेच्या धक्क्याने वळण येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.