ETV Bharat / state

आमदार नीलेश लंके यांच्या कामाचे मुंबईतही कौतुक - अहमदनगर लेटेस्ट न्यूज

मंत्रालयातील काम आटोपून परतत असताना मरीन ड्राइव्हवर थांबवून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची विचारणा केली. दरम्यान आमदार लंके यांच्या मुंबईदौऱ्या दरम्यान १९ लाख रूपयाची देणगी जमा झाल्याचे अ‍ॅड. राहूल झावरे यांनी सांगितले आहे.

आमदार लंके
आमदार लंके
author img

By

Published : May 14, 2021, 7:49 PM IST

अहमदनगर - महिनाभराच्या अवधीनंतर आमदार नीलेश लंके मुंबईत पोहचले त्यावेळी सर्वांनीच त्यांची भेट घेतल्याचे पहायला मिळाले. मंत्रालयात ते पोहचताच विविध मतदारसंघातील आमदारांनी त्यांची भेट घेतली. कोविड सेंटर कसे चालविता? अशी विचारणा करीत त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आले. मंत्रालयातील काम आटोपून परतत असताना मरीन ड्राइव्हवर थांबवून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची विचारणा केली. दरम्यान आमदार लंके यांच्या मुंबईदौऱ्या दरम्यान १९ लाख रूपयाची देणगी जमा झाल्याचे अ‍ॅड. राहूल झावरे यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत तब्बल सव्वा कोटींची आर्थिक मदत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आमदार लंके यांनी दि. १४ एप्रिल रोजी शरद पवार आरोग्य मंदीराच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू केले. १ हजार सामान्य तर १०० ऑक्सिजन बेडची सुविधा त्यांनी दिली आहे. पहिल्या लाटेतही १ हजार बेडचे आरोग्य मंदीर सुरू करून शरद पवार यांच्यासह राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या महिन्यात त्यांनी सुरू केलेल्या आरोग्य मंदीरात नगर जिल्ह्याबरोबरच राज्यातील रूग्ण दाखल झाले. एक रूपये न घेता रूग्णांचे औषधोपचार, पौष्टीक आहार तेथे देण्यात येत आहे. या कामासाठी देश विदेशातून आतापर्यंत तब्बल सव्वा कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. मदतीचा ओघ अजूनही सुरूच आहे.

वरिष्ठ, सहकारी आमदार, नागरिकांनी केले कौतुक

महिनाभराच्या अंतराने मुंबईत पोहचलेले आमदार लंके सकाळी मंत्रालयात पोहचले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची पाठ थोपटून कौतुक केले. पक्षाचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना शाब्बासकी दिली. पारनेर भागाशी जोडलेले भोईसर, मानखुर्द, घाटकोपर, ठाणे, सानपाडा, कामोठे, नेरूळ येथील मुंबईकरांनी आमदार लंके यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

हेही वाचा -राज्यातील रुग्णवाहिकांना चंद्रपूर पॅटर्नचा दणका; परिवहन विभागाकडून भाडेदर निश्चित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.