ETV Bharat / state

"मोठ्या भावानं भाऊबीज भेट दिली असेल", भावना गवळींची बँक खाती गोठवल्यावरून भास्कर जाधवांची टीका - भावना गवळी

Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिर्डीत बोलताना राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. "या सरकारनं महाराष्ट्राची वैचारिक परंपरा बर्बाद केली", असं ते म्हणाले.

भास्कर जाधव
भास्कर जाधव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 10:28 PM IST

भास्कर जाधव

शिर्डी (अहमदनगर) Bhaskar Jadhav : मुंबईत सुरू केलेली 'डिप क्लिनिंग ड्राइव्ह' अर्थात संपूर्ण स्वच्छता मोहीम पूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी खरमरीत टीका केली.

काय म्हणाले भास्कर जाधव : "विद्यमान सरकारच्या चारित्र्य आणि निष्ठेवरच डाग पडलेला आहे. त्यांनी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा बर्बाद केली. आता हा डाग कसा पुसणार", अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. "कपड्यावरील डाग साबणानं किंवा वॉशिंग पावडरनं धुता येतो, परंतु सरकारवर पडलेला डाग कसा पुसणार", असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मोठ्या भावानं भाऊबीज भेट दिली : शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांची बँक खाती गोठवल्यावरून भास्कर जाधव यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली. "त्यांनी आपल्या एका मोठ्या भावाला राखी बांधली होती. कदाचित त्या मोठ्या भावानंच त्यांना ही भाऊबीज भेट दिली असेल", अशी टीका भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता केली.

शरद पवारांचा आदर्श घ्यावा : भास्कर जाधव यांनी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना जोरदार चपराक लगावली. "शरद पवारांचा स्टॅमिना, फिरण्याची धमक, उत्साह 20 वर्षाच्या तरुणाला लाजवणारा आहे. अजित पवार वारंवार तोच मुद्दा उपस्थित करतात. त्यामुळे याकडे लक्ष द्यायची गरज नाही. अजित पवारांनी शरद पवारांचा वाढत्या वयात काम करण्याच्या वृत्तीचा आदर्श घ्यावा. उगाच वयाच्या विषयावरून त्यांच्यावर वारंवार टीका करून आपलं कर्तुत्व त्या आड लपवू नका", असं भास्कर जाधव म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. वाहनांची रांग पाहून राज ठाकरे उतरले टोल नाक्यावर; मग काय झालं? पाहा व्हिडिओ
  2. बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड अन् शुद्ध आल्यावर वेगळीच बडबड; धनंजय मुंडेंची आव्हाडांवर टीका
  3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट पाकिस्तान सीमेवर, काय आहे विषय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.