ETV Bharat / state

न्यायालय आता राज्यपाल नियुक्त 12 जागांबद्दलही लवकर निर्णय देईल अशी धारणा - बाळासाहेब थोरात

विधिमंडळ तालिकाध्यक्षांनी पावसाळी अधिवेशनात भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले होते. हे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले (SC Canceled 12 MLA Suspension) आहे. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Minister balasaheb thorat
मंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Jan 29, 2022, 6:59 PM IST

Updated : Jan 29, 2022, 7:55 PM IST

अहमदनगर - विधिमंडळ तालिकाध्यक्षांनी पावसाळी अधिवेशनात भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले होते. हे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले (SC Canceled 12 MLA Suspension) आहे. यावर बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आता राज्यपालांनी मंजुरीसाठी प्रलंबित ठेवलेले आमचे बारा आमदारांबाबत असलेल्या याचिकेवर असाच निर्णय घेईल असे मला वाटते. अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बाळासाहेब थोरात - महसूलमंत्री

वाईन आणि मद्यातला फरक विरोधीपक्षांनी समजून घ्यावा-

राज्य मंत्रिमंडळात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीवर भाजपकडून होत असलेल्या टीकेवर बोलताना थोरात यांनी विरोधकांना मद्य आणि वाईनमधला फरक समजला नसल्याचा टोला लगावला. नाशिक भागात द्राक्षाचे मोठे उत्पादन असून, अनेक वायनरी आहेत. यातून शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

मास्क फ्रीवर मंत्रिमंडळात चर्चा -

मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होत असते. ज्या देशात दोन कोविड डोससह बूस्टर डोस झाला आहे अशा देशांत मास्क न वापरण्याला परवानगी आहे. मात्र, आपल्याकडे अजून दोनही डोस अनेकांनी घेतले नाहीत, असे सांगत एक प्रकारे मंत्रिमंडळ बैठकीत याविषयावर चर्चा झाल्याचे सूचित केले.

वीज बिले भरणे गरजेचे बनले आहे-

वीज वापरली तर बिले ही सगळ्यांना भरणे गरजेचे आहे. राज्य शासन शक्य तेवढी मदत शेतकऱ्यांना करतच आहे. मात्र जर सत्तर हजार कोटींवर थकबाकी गेली असेल तर वीज कंपनी चालणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित करून वीज बिले भरली पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jan 29, 2022, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.