ETV Bharat / state

कोरोनामुक्त गाव अभियानात सहभाग घ्या - महसूलमंत्री थोरात

राज्य सरकारने सुरू केलेल्या कोरोना मुक्त गाव अभियानात सहभाग घ्यावा व लवकरात लवकर आपले गाव, तालुका, जिल्हा व राज्य पूर्ण कोरोना मुक्त करण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महसूल बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

कोरोना मुक्त गाव अभियानात सहभाग घ्या - महसूलमंत्री थोरात

author img

By

Published : Jun 13, 2021, 5:48 PM IST

अहमदनगर - राज्यातील शहरी भागातील कोरोना आटोक्यात येत असून ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढ पूर्णपणे रोखण्यासाठी सर्व गावांतील नागरिकांनी पुढाकार घेत राज्य सरकारने सुरू केलेल्या कोरोना मुक्त गाव अभियानात सहभाग घ्यावा व लवकरात लवकर आपले गाव, तालुका, जिल्हा व राज्य पूर्ण कोरोना मुक्त करण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महसूल बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर आयोजित गावच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी हे उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या उपाययोजनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी ही आणि या वर्षीच्या दुसऱ्या लाटेत ही अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. महाराष्ट्राने केलेल्या कोरोना बाबतच्या उपाययोजनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, मी जबाबदार या अभियानांतर्गत गावोगावी नागरिकांची तपासणी झाली. जास्त तपासणीमुळे रुग्णसंख्या काही काळ वाढलेली दिसली, मात्र यातून त्या नागरिकांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले. यामध्ये नागरिकांचीही मोठे सहकार्य लाभले आहे. कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. त्याला पूर्णपणे घालविण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाउनच्या शिथिलते नंतर काहीशी वाढणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करा. नेहमीच मास्कचा वापर करा, सोशल डिस्टनचे पालन करा व कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या.

कोरोनामुक्त गाव अभियानात प्रत्येक गावांनी सहभाग घ्यावा

याच बरोबर आपले कुटुंब, आपले गाव पूर्ण कोरोना मुक्त करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कोरोना मुक्त गाव अभियानात प्रत्येक गावांनी सहभाग घ्यावा. यामुळे प्रत्येक गाव कोरोना मुक्त होऊन आपला तालुका कोरोना मुक्त होईल. त्यानंतर जिल्हा, राज्य व आपला देश ही कोरोना मुक्त होईल. या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेताना या अभियानात प्रत्येकाने सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांनी कायम सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. हे कोरोनाचे संकट आपल्याला पूर्णपणे घालवायचे आहे. यासाठी नागरिकांनी कायम सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाने सुरू केलेल्या कोरोना मुक्त गाव अभियान मध्ये आपण सक्रीय सहभाग घ्या. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून यामध्ये १७१ गावांपैकी ८१ गावे कोरोना मुक्त झाली असून ३१ गावे लवकरच कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत. ही आनंदाची बाब आहे मात्र संपूर्ण तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे, असेही ते म्हणाले. यावेळी गावच्या प्रतिनिधींनी गावांबाबतची माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.