ETV Bharat / state

विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहिल - बाळासाहेब थोरात - बाळासाहेब थोरात न्यूज

विधानसभा अध्यक्षपद हे पूर्वी काँग्रेस पक्षाकडे होते आणि या पुढेही राहिल यात कसलीही अडचण नाही. येत्या एक मार्चपूर्वी अर्थात विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधी महाविकास आघाडीत याबाबत चर्चा केली जाईल. यात हे पद काँग्रेसकडेच राहिल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

minister balasaheb thorat on maharashtra Assembly Speaker
विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील - बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Feb 11, 2021, 4:46 PM IST

अहमदनगर - काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे हे पद सद्यस्थितीत रिक्त आहे. एक मार्चपूर्वी, विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधी महाविकास आघाडीत चर्चा होऊन, हे पद पुन्हा काँग्रेस पक्षाकडे असेल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना थोरात यांनी सांगितले की, 'हे पद पूर्वी काँग्रेस पक्षाकडे होते आणि यापुढेही राहिल यात कसलीही अडचण नाही. येत्या एक मार्चपूर्वी अर्थात विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधी महाविकास आघाडीत याबाबत चर्चा केली जाईल. यात हे पद काँग्रेसकडेच राहिल.'

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बोलताना...

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची माळ नाना पटोले यांच्या गळ्यात पडली. आता थोरात यांच्या नावाची चर्चा उपमुख्यमंत्रीपदासाठी होत आहे. याबाबत थोरात यांना विचारले असता, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी आपल्या नावाची चर्चा ही मीडियात आहे. मात्र याबाबत आमच्यात कसलीही चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

मतपत्रिकेद्वारे मतदान हे विश्वासार्ह -
जगात अनेक पुढारलेल्या देशात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेत निवडणुका होत आहेत. इतर देशात मतपत्रिकेद्वारे मतदान होत असताना राज्याच्या मावळत्या विधानसभा अध्यक्षांनी किमान राज्यात शक्य असेल त्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे निवडणुका व्हाव्यात, असा प्रस्ताव ठेवलेला आहे. हा प्रस्ताव विश्वासार्ह असल्याने तो स्वीकारला पाहिजे, असे मत थोरात व्यक्त केले.

हेही वाचा - अपेक्षित दर नाही; शिर्डीतील फुल उत्पादक शेतकरी आजही संकटात

हेही वाचा - विशेष : अबब...! बुलेटच्या किंमतीत मिळाली 'शेळी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.