ETV Bharat / state

शासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेची 'शानदार' सुरुवात, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ

author img

By

Published : Dec 8, 2019, 4:02 PM IST

शासकीय आदिवासी व अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा, विज्ञान, गणित कलादालन प्रदर्शनाचे ७ ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

Minister Balasaheb Thorat launched the Government divisional tribal sports  tournament
शासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेला 'शानदार' सुरुवात, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते स्पर्धेचा शुभारंभ

शिर्डी - 'आदिवासी शाळांतील मुलांनी केलेले सुंदर संचलन, आत्मा मालिक संकुल आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मी भारावून गेलो आहे', असे गौरवोद्गार मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथे आदिवासी विभागाने आयोजित केलेल्या शासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी काढले. अध्यात्माची जोड दिल्याने मानवतेची सेवा करण्याचे काम आत्मा मालिक ध्यानपीठ करत आहे, असे प्रतिपादनही थोरात यांनी केले.

Minister Balasaheb Thorat launched the Government divisional tribal sports  tournament
स्पर्धक

स्पर्धांचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करताना बाळासाहेब थोरात

हेही वाचा - INDvsWI 2nd T-20 : टीम इंडियासमोर मालिका विजयाचे ध्येय

शासकीय आदिवासी व अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा, विज्ञान, गणित कलादालन प्रदर्शनाचे ७ ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. 'आदिवासी समाज जिद्दी असून त्यांच्यामध्ये चिकाटी आहे. यामुळेच शिक्षण क्षेत्रात आणि खेळामध्ये आदिवासी विद्यार्थी पदके प्राप्त करतात. सरकार देखील या कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे. या स्पर्धेतून तयार झालेले खेळाडू भविष्यात ऑलिंम्पिकमध्ये सहभागी होतील', असे थोरात यांनी म्हटले.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये नाशिक, कळवण, तळोदा, धुळे, यावल, राजूर, नंदुरबार या आदिवासी विकास प्रकल्पामधील २,७७९ खेळाडू सहभागी झाले आहेत. मशाल फेरीद्वारे क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून आकाशात फुगे सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, विविध खेळांचे पंच मोठया संख्येने उपस्थित होते.

शासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेला सुरूवात

आदिवासी विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. १९ क्रीडा प्रकारातून सुमारे २,९०० विद्यार्थी स्पर्धेत भाग घेत असून, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थी या स्पर्धेमधून निवडले जाणार असल्याची माहिती दिली. नाशिक विभागातील विद्यार्थी राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विज्ञान व गणित या विषयात विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते असे त्यांनी सांगितले. यावेळी आ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांनी स्पर्धेत सहभागी आदिवासी विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आदिवासी विभाग अपर आयुक्त गिरीश सरोदे, उपायुक्त प्रदीप पोळ, प्रकल्प प्रमुख संतोष ठुबे, आदिवासी सेवक बाबा खरात, नगरसेवक राहुल दिवे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राजेंद्र पिपाडा, अशोक खांबेकर,आत्मा मालिक माऊली, परमानंद महाराज, संत मांदियाळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, आत्मा मालिक फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, वसंत आव्हाड, माधव देशमुख, प्राचार्य सुधीर मलिक उपस्थित होते.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

आदिवासी शाळांतील मुलांनी केलेले सुंदर संचलन आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मी भारावून गेला आहे, असे गौरवोदगार मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथे आदिवासी विभागाने आयोजित केलेल्या शासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी काढले. आत्मा मालिक संकुल पाहून देखील मी खूप भारावून गेलो असून अध्यात्माची जोड दिल्याने मानवतेची सेवा करणायचे काम आत्मा मालिक ध्यानपीठ करत आहे असे प्रतिपादन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले...

शासकीय आदिवासी व अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रिडा स्पर्धा, विज्ञान,गणित कलादालन प्रदर्शनाचे 7 ते 9 डिसेंबर,2019 दरम्यान आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आणि प्रदर्शनाचे उदघाटन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते....खासदार सदाशिव लोखंडे,आ.सुधीर तांबे, आ लहू कानडे, आदिवासी विभाग अपर आयुक्त गिरीश सरोदे, उपायुक्त प्रदीप पोळ, प्रकल्प प्रमुख संतोष ठुबे, आदिवासी सेवक बाबा खरात, नगरसेवक राहुल दिवे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राजेंद्र पिपाडा, अशोक खांबेकर, प.पू.आत्मा मालिक माऊली, संत परमानंद महाराज व संत मांदियाळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, आत्मा मालिक फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, वसंत आव्हाड, माधव देशमुख, प्राचार्य सुधीर मलिक उपस्थित होते....

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आदिवासी समाज जिद्दी असून त्यांच्यामध्ये चिकाटी आहे. यामुळेच शिक्षण क्षेत्रात आणि खेळामध्ये आदिवासी विद्यार्थी पदके प्राप्त करतात. शासन देखील या कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे. या स्पर्धेतून तयार झालेले खेळाडू भविष्यात ऑलिंम्पिकमध्ये सहभागी होतील अशी आशा मंत्रीमहोदयांनी यावेळी व्यक्त केली....

आदिवासी विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 19 क्रीडा प्रकारातून सुमारे दोन हजार नऊशे विद्यार्थी स्पर्धेत भाग घेत असून, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थी या स्पर्धेमधून निवडले जाणार असल्याची माहिती दिली. नाशिक विभागातील विद्यार्थी राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विज्ञान व गणित या विषयात विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते असे त्यांनी सांगितले. यावेळी आ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे यांनी स्पर्धेत सहभागी आदिवासी विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या....

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये नाशिक, कळवण, तळोदा, धुळे, यावल, राजूर, नंदुरबार या आदिवाी विकास प्रकल्पामधील 2 हजार सातशे 79 खेळाडू सहभागी झाले आहेत. मशाल फेरीद्वारे क्रीडा ज्योतिचे प्रज्वलन करून आकाशात फुगे सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, विविध खेळांचे पंच मोठया संख्येने उपस्थित होते....Body:mh_ahm_shirdi_balasaheb thorat on school_8_photo_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_balasaheb thorat on school_8_photo_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.