ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींच्या दुर्लक्षामुळेच देशावर कोरोनाचे संकट; मंत्री बच्चू कडूंचा 'प्रहार'

देशात वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे. ऑक्सिजन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाहीत. म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही. उलट ते जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना हद्दपार झाला आहे, अशा शब्दांत मंत्री बच्चू कडूंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

bachhu kadu ahmednagar ,बच्चू कडू , bachhu kadu latest news,
बच्चू कडू
author img

By

Published : May 13, 2021, 7:21 AM IST

अहमदनगर - महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना गेला म्हणून.. पण झाले काय, आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

अहमदनगर इथे प्रहार जनशक्तीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची त्यांनी पाहणी करून कार्यकर्ते, रुग्ण, नातेवाईक यांच्याकडून अडीअडचणींची माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील आणि त्यात महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना संसर्गावर बोलताना मोदींवर टीका केली. देशात वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे. ऑक्सिजन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाहीत. म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही. उलट ते जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना हद्दपार झाला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना मंत्री बच्चू कडू..

राज्यात ऑक्सिजनचे प्लांट उभे रहात आहेत-

राज्याला केंद्राकडून गरजेपेक्षा कमी ऑक्सिजन मिळत आहे. मात्र, राज्याने याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पावले उचलली असून काही ऑक्सिजन प्लांट सुरू झाले असून काही लवकरच सुरू होतील. राज्यात साखर कारखाने, खासगी उद्योजकांना यासाठी सवलती देऊन ऑक्सिजन प्लांट उभे राहत आहेत, अशी माहिती कडू यांनी दिली.

लसीकरणाची गरज पण केंद्राकडून उपलब्धता नाही-

लसीकरणाची सर्वांना आवश्यकता आहे. मात्र, केंद्र पुरवठा करते त्या संख्येत लसीकरण करावे लागत आहे. सुरुवातीला जनतेच्या मनात काही शंका होत्या. लोक लस घेण्यास पुढे येत नव्हते. लसी पडून होत्या. मात्र नंतर याबाबत जनजागृती झाली आणि नागरिकांनी अचानक लसीकरणासाठी मोठी गर्दी केली. मात्र नागरिकांनी रजिस्ट्रेशन करून नंतरच लसीकरणास यावे, उगाच गर्दी करून संसर्ग वाढू शकतो, असे बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा - 'लस महोत्सव' साजरा केला, मात्र लसीची व्यवस्था नाही'; प्रियंका गांधींचा मोदींवर घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.