नेवासा (अहमदनगर) - शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) हा विश्वासू आणि कामाचा माणूस आहे. सोबत घेऊन काम करायचे असेल तर त्यांना मंत्री केले पाहिजे, असे उद्धव साहेबांनी सांगितल्याने शंकररावांना मंत्री केल्याचे गौरवोद्गार राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी काढले. नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने ( Sonai Mula Sugar Factory ) मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Minister Shankarrao Gadakh ) यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या 80 कोटी रुपये खर्चाच्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी 18 फेब्रुवारीला आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray Inaugrate Ethenol Project Sonai ) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राजकारणातील प्रदूषण कोण?
मंत्री म्हणून ठोस कामे घेऊन जनतेसमोर जाणे हे माझी आणि शंकरराव यांची जबाबदारी आहे. कोविड संपू दे आणि नवीन महाराष्ट्र घडविण्याची ताकद दे हीच ईश्वराकडे मागणी आहे. लिक्विड झिरो डिस्चार्ज करून मुळा कारखान्याने झिरो लिक्विड डिस्चार्ज या तत्त्वावर यंत्रणा कार्यान्वित करून होणारे प्रदूषण रोखले आहे. तसेच राजकारणातील प्रदूषण महाराष्ट्रात आपण दूर ठेवलेले आहे. त्यांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. रोज नवीन आरोप, रोज खालची पातळी, प्रत्येक ठिकाणी राजकारण सुरू आहे, आता राजकारणातील प्रदूषण कोणतं हे तुम्हीच ठरवा अशी कोटी भाजपचे नाव न घेता ठाकरे यांनी केली. मात्र, सत्तेचा माज न आणता आघाडी सरकार जनतेची कामे करीत आहे. कोविड काळात सरकारने चांगली कामगिरी केलेली आहे. शेतकरी, महिला व तरुणांसाठी सरकार काम करीत आहे. कोरोनामुळे होणार थेट संवाद खुंटला होता. तो आता सुरू झालेला आहे. येथे आल्यावर सर्वांची एकजूट दिसून आली. ती अशीच जपून ठेवा. पहिल्या दिवसापासून शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. ते अत्यंत विश्वासू व कामाचा माणूस असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
कारखान्याला नोटीस हा राजकारणाचा भाग -
शंकरराव गडाख म्हणाले, मुळा कारखान्याच्या डिस्टिलरीमुळे प्रदूषण होते या नावाखाली राजकिय दबावामुळे भाजप सरकारच्या काळात कारखान्याला नोटीस आली. प्रदूषण कमी आणि राजकारण जास्त यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे जुन्या डिस्टिलरीचे आधुनिकीकरण केले. इन्सनरेशन बॉयलर घेऊन लिक्विड झिरो डिस्चार्ज प्रकल्प केल्याने आता प्रदूषण होणार नाही. प्रतिदिन 1.5 लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणारा व धाडसी निर्णय घेणारा जिल्ह्यात मुळा हा सहकारातील एकमेव कारखाना आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा विकास करायचा, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अडचणीच्या काळात उद्धव साहेबांनी मदत केली ही जाणीव ठेवून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यात शिवसंवाद मेळावे घेऊन पक्ष बळकट केला जात आहे. जिल्ह्यात सेनेच्या 1000 शाखा करणे व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे उपस्थितीत 1 लाख शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात येणार आहे.
हेही वाचा - Nagar Parishad formed in Shirdi : अखेर नगरपंचायतची झाली नगरपरिषद; शिर्डीत सर्वपक्षीयांचा जल्लोष
कोरोनाकाळातील कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांचे देशात नाव -
माजी खासदार यशवंतराव गडाख म्हणाले, 40 वर्षांपूर्वी प्रतिदिन 1500 मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेचा कारखाना मी उभा केला. स्थापनेपासून कारखाना माझ्याच ताब्यात आहे. हा सभासदांचा विश्वास असल्याने शक्य झाले. शेतकऱ्यांचा विकास झाला. आता शंकरराव बघतात. कर्ज काढून नवीन प्रकल्प उभारणीचा शंकररावांनी धाडसी निर्णय घेतला. प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज चार-पाच वर्षात फेडू. उद्धव ठाकरे सारखेंसारखे मनमिळावू, सुसंस्कृत आणि संवेदनशील मुख्यमंत्री मिळाले हे आपले सर्वांचे भाग्य आहे. तीन पक्षाचे आघाडी सरकार ते मोठ्या हिंमतीने चालवत आहेत. कोरोना काळात केलेल्या कामामुळे देशात उद्धवजींचे नाव झाले, असेही ते म्हणाले.