ETV Bharat / state

Guru Pournima In Shirdi: गुरूपौर्णिमा निमित्ताने लाखो भाविक शिर्डीत दाखल

साईबाबाच्या शिर्डीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची ( Guru Pornima ) आज मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. साईबाबांना आपले गुरु मानणारे लाखो भक्त आज शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रत्येक भक्त आज स्वताला धन्य मानत आहे.

Guru Pournima In Shirdi
गुरूपौर्णिमा उत्सव
author img

By

Published : Jul 13, 2022, 12:44 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) - साईबाबाच्या शिर्डीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची ( Guru Pornima ) आज मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे.साईबाबांना आपले गुरु मानणारे लाखो भक्त आज शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रत्येक भक्त आज स्वताला धन्य मानत आहे.

गुरूपौर्णिमा उत्सव

व्यास पौर्णिमा - गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा पण म्हटले जाते. सन 1908 साली साईबाबाच्या अनुमतिने या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली. साईबांचे परमभक्त तात्यासाहेब नूलकर, तात्या कोते पाटील आणि काही भक्तांनी व्यास पौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून पूजा केली आणि तेव्हापासून शिर्डीमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवला सुरुवात झाली. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतीमा, विणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या द्वारकामाईपर्यंत नेण्यात आली. द्वारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन मिरवणूक गुरूस्थान मंदिराच्या मार्ग समाधी मंदिरात आणण्यात आली आणि आजच्या गुरुपोर्णिमा उत्सवच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली.

लाखोंचा जनसागर उसळला - साईबाबाच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कान्या कोपऱ्यातून आज लाखो भक्त ( Big Crowd Of Devotees ) आले असून पूणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. सन 1908 साली साईबाबांच्या अनुमतीने सुरु झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवला आज 115 वर्षा पूर्ण झाली आहेत. साईबाबा संस्थानच्यावतीने भक्तांना व्यवस्थित साईबाबाचे दर्शन मिळावे यासाठी आज रात्रभर मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. शिर्डीच्या साईबाबांना ( shirdi sai baba ) गुरू स्वरुप मानून गुरू प्रती आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला आहे. गुरूपोर्णिंमा उत्सवात तीन ते चार लाख भाविक साई समाधीवर नतमस्तक झाले आहेत. साईंच्या गुरूस्थान मंदिरातही भाविकांची रिघ लागली आहे. साईनामाचा गजर करत हजारो भाविक पायी चालत शिर्डीला येत आहेत. पायी साईपालख्यांमुळे शिर्डीतील सर्व मुख्य रस्ते गर्दीन फुलून गेलेत.

भाविकंच्या भावना अनावर - उत्सवाचा मुख्य दिवस असल्यान काकड आरतीला हजेरी लावण्यासाठी भक्तांची लगभग रात्री पासुनच दिसुन आली. आजच्या काकड आरती नंतर साईबाबांच्या प्रतीमा , पोथी आणि विणा यांची सवाद्य मिरवणूक गुरूस्थान मार्गे द्वारकामाईत नेण्यात आली त्यानंतर साईंना मंगलस्नान घालण्यात आल.साईसमाधी मंदिर , द्वारकामाई, चावडी आणि गुरूस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आल आहे. तसेच साईच्या मुर्तीला सुवर्ण आभूषण घालण्यात आले आहेत. त्यामुळे बाबाचे रूप डोळ्यात साठवताना भाविक भाऊक होताना दिसत आहेत.

भक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन - साई समाधीचे दर्शन घेऊन गुरूस्थान मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेन आणि भक्तीभावान माथा टेकवत आहेत. गुरूचरणी गुरूदक्षिणा म्हणून काही तरी बाबांना द्याव या गुरूभक्तीन भाविक यथा शक्ती दान देतात दर गुरूपोर्णिमेला बाबांच्या दानात वाढ ( Devotee Donate In Sai Baba Temple )होतेय हा अनुभव आहे. गर्दीत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी साईसमाधी मंदिर रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुल राहणार आहे. साईभक्तांसाठी साईबाबा संस्थानकडून ( Sai Baba Sansthan ) विविध भक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलीस प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.

हेही वाचा - Maharashtra and India Rain Update : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊ, पाहा या ठिकाणांची परिस्थिती!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.