अहमदनगर - दिल्लीतील निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला व्यक्ती आज नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असल्याचे समोर आले. प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच तातडीने त्याच्यासह कुटुंबातील १२ जणांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले.
या घटनेने पाथर्डीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी या माहितीला दुजोरा दिला. प्रशासन मरकजवरून कुणी आले आहे का? याचा शोध घेत होते. मात्र, कुणीही स्वतः हून पुढे येत नव्हते. मात्र, पाथर्डी शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका गावातील ही व्यक्ती आज आढळून आली.
त्याच्या वडिलांच्या आजारपणातून संबंधित व्यक्तीची मरकज वारी समजली. यामुळे प्रशासन कमालीचे सतर्क झाले असून आता त्या व्यक्तीसह घरातील बारा जणांची तपासणी करण्यात येणार आहे.