ETV Bharat / state

माहुली घाटात आंब्याने भरलेला पिकअप उलटला; चालक जखमी - आंबे घेऊन जाणारा पिकअप

नाशिक राष्ट्रीय महामार्गावरीव माहुली घाटात आले असता, अनियंत्रित झालेले पिकअप उलटले. या अपघातामुळे पिकअप मधील सर्व आंबे महामार्गावर पडले. अनेक आंबे खराब झाले तसेच कॅरेटची आणि पिकअपचीही मोडतोड झाली आहे. तर चालक साठे यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

आंब्याने भरलेला पिकअप उलटला
आंब्याने भरलेला पिकअप उलटला
author img

By

Published : May 23, 2021, 11:41 AM IST

शिर्डी - केशर आंबे घेवून जाणारी मालवाहू पिकअप संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात उलटल्याची घटना घडली आहे. रविवार (२३ मे) ला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पिकअप रस्त्यावरच पलटी झाल्यामुळे महामार्गावर आंब्याचा सडा पडला होता. तर काही काळासाठी महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेत पिकअपचा चालक जखमी झाला आहे.

मालवाहू पिकअप (एमएच १४ जे.एल ०३८७) या वाहनावरील चालक मनोज गोविंद साठे हे गुजरात येथून अंदाजे शंभर कॅरेट केशर आंबे घेवून पुण्याला येत होते. रविवारी सकाळी त्यांचे वाहन पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरीव माहुली घाटात आले असता, अनियंत्रित झालेले पिकअप उलटले. या अपघातामुळे पिकअप मधील सर्व आंबे महामार्गावर पडले. अनेक आंबे खराब झाले तसेच कॅरेटची आणि पिकअपचीही मोडतोड झाली आहे. तर चालक साठे यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस हेडकाॅन्सटेबल नारायण ढोकरे, भरत गांजवे पोलिस काॅन्सटेबल विशाल कर्पै आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हिवरगावा पावसा टोलनाक्याचे क्रेन बोलवून हे पिकअप महामार्गावरून हटवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.