अहमदनगर - राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. यामुळे पुन्हा टाळेबंदी होईल आणि टाळेबंदी झाली तर कर्जाचे हप्ते कसे फेडायचे या विवंचनेतून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 22) घडली.
विष्णू बाबासाहेब गांगुर्डे (वय 30 वर्षे, रा. गौतम नगर, रेल्वे स्टेशन, राहुरी), असे मृताचे नाव आहे. तो मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याने बचत गटाचे कर्ज घेतले होते. काही रक्कम मित्रांकडून हातउसनी घेतली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला. त्यामुळे पुन्हा टाळेबंदी सुरू होईल. या भीतीने तो चिंतेत होती. कर्ज कसे फेडायचे. याची चिंता त्याने बोलून दाखवल्याची माहिती त्याच्या मित्रांनी सांगितले.
मृताच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनाचा पार्श्वभूमीवर साई मंदिरातील काही नियमांमध्ये बदल