ETV Bharat / state

महाशिवरात्री निमित्ताने संस्थानकडून साईभक्तांना साबुदाणा खिचडी अन् झिरकाचा प्रसाद - महाशिवरात्री बातमी

आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने हजारो भाविक शिर्डीतील साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी हजारो नागरिक शिर्डीत दाखल झाले आहेत. भाविकांचा आज उपवास असेल या दृष्टीने साई संस्थानकडून साई प्रसादलयात साबुदाणा खिचडी व झिरके साई प्रसाद म्हणून दिला जाते आहे.

edited photo
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 11, 2021, 4:40 PM IST

Updated : Mar 11, 2021, 4:51 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - आज (दि. 11 मार्च) देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून साईबाबांच्या शिर्डीतही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांनी आपल्या हयातीत भाविकांना अनेक रूपात दर्शन दिले असल्याने आज महाशिवरात्री निमित्ताने हजारो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

आज महाशिवरात्री असल्याने साईबाबांच्या समाधीवर महादेव यांच्या प्रतिमा ठेवण्यात आली असून आज साईभक्त साईबाबांचे दर्शन घेत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आज महाशिवरात्री निमित्ताने उपवास असल्याच लक्षात घेता साई संस्थानच्या वतीने साई प्रसादलयात साबुदाणा, शेंगदाणे आणि वनस्पती तुपापासुन तब्बल 70 क्विंटल साबुदाण्याची खिचडी तसेच झिरके बनवण्यात आले असून साईभक्त मोठ्या आनंदाने खिचडीचा आस्वाद घेत आहेत.

शिर्डी साईबाबांचा साई प्रसादलयात भाविकांना दररोज भात, वरण, चपाती, भाजी तसेच मिठाई साई प्रसाद म्हणून साई संस्थानकडून मोफत दिला जाते. मात्र ,ज्यावेळी आषाढी एकादशी, महाशिवरात्री असते त्यावेळी भाविकांना उपवास असल्याने साई संस्थानकडून साई प्रसादलयात साबुदाणा खिचडी व झिरके साई प्रसाद म्हणून दिला जात आहे. दररोज 60 ते 70 हजार भाविक साईबाबांच्या साई प्रसादलयातील प्रसादाचा लाभ घेत असतात. मात्र, कोरोनाचा पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून लावण्यात आलेले निर्बंधामुळे यंदाचा वर्षी भाविकांची संख्या घटली असल्याचे पहायला मिळत आहे.

सध्या राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढत असल्याने राज्य सरकारने काही नियम आणि अटी घालून दिले आहेत. यामुळे साई संस्थानकडून या नियमांचे पालन केले जात असल्याचे पहिला मिळत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने साईबाबांचे दर्शन बुकिंग करूनच शिर्डीत यायचे आहे. तरच भाविकांना साईबाबांचे दर्शन भाविकांना मिळणार आहेत. त्याचबरोबर साईबाबांचा साई प्रसादलयात भाविकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून बसवण्यात येत आहे. यामुळे साई संस्थानच्या वतीने कोरोनाचा पार्श्वभूमीवर केलेली उपयोजनाचे भाविकांकडूनही कौतुक केले जात आहे.

हेही वाचा - संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी 40 कोटींचा निधी अर्थसंकल्पातून मंजूर

हेही वाचा - साईबाबा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लसीचे दोन डोस घेऊनही अहवाल आज पॉझिटिव्ह

Last Updated : Mar 11, 2021, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.