अहमदनगर - महाराष्ट्र राज्य डीएड पदवीधर समन्वय समितीचे महाअधिवेशन राहाता येथील शारदा विद्यामंदिरच्या सभागृहात नुकतेच पार पडले. यावेळी प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य डीएड पदवीधर समन्वय समितीचे महाअधिवेशन, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वर्धा येथील सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग हे होते. शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १४/११ चे परिपत्रक काढून सेवाजेष्ठता कशी करावी याबद्दल निर्देशित केले आहे. या नुसार डी. एड पदवीधर शिक्षकांना सेवाजेष्ठतेच्या आधारे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदावर पदोन्नतीची संधी मिळाली होती. मात्र, ४ डिसेंबरचे परिपत्रक काढून पदोन्नतीची थांबवल्या आहेत. या मुळे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळून सेवानिवृत्त होन्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. हा पदवीधर शिक्षकांवर अन्याय आहे.
मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापकपदाच्या पदोन्नतीवरील बंदी तत्काळ उठवावी. नियुक्ती दिनांकानुसार सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती देण्याचे आदेश १५ दिवसांच्या आत निर्गमित करावेत. अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य डी.एड पदवीधर समन्वय समितीच्या वतीने महाधिवेशनात देण्यात आला.