ETV Bharat / state

'साईंच्या जन्मस्थळाचा वाद नको, शांतता पाळावी'

देशात आधीच वाद सुरू आहेत. त्यात आणखी शिर्डी साईंच्या जन्मस्थळाचा वाद नको. त्यामुळे, यासंदर्भात संप सुरू ठेवणे उचित ठरणार नाही, असे वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

Cabinet Minister Chagan Bhujbal urges to end strike in Shirdi
'साईंच्या जन्मस्थळाचा वाद नको, शांतता पाळावी'
author img

By

Published : Jan 19, 2020, 6:12 PM IST

Updated : Jan 19, 2020, 7:57 PM IST

अहमदनगर - देशात आधीच वाद सुरू आहेत. त्यात आणखी शिर्डी साईंच्या जन्मस्थळाचा वाद नको. त्यामुळे, यासंदर्भात संप सुरू ठेवणे उचित ठरणार नाही, असे वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच साईबाबा सर्व जाती, धर्म, पंथांचे प्रतिक असल्याने त्यांच्या जन्मस्थळावरून कोणीही वाद निर्माण करू नये, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले. ते शिर्डीत बोलत होते.

छगन भुजबळ (अन्न व नागरीपुरवठा मंत्री)

भुजबळ पुढे म्हणाले, साईबाबांच्या जन्मस्थळाचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यासंदर्भात तेच या विषयावर अधिक बोलतील. मात्र, सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत बोलणे योग्य नाही . साईबाबांनीच आपल्या साईचरित्रात कोठेही उल्लेख केला नाही. जात, पात, धर्म साईबाबांनाच मान्य नव्हते. यापुर्वीही साईबाबांबद्दल अनेकांनी वाद घातले आहेत. तरी शिर्डीचे महत्त्व कमी झाले नाही.

हेही वाचा - 'राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक नव्या पिढीली आधुनिकतेचा आणि समतेचा विचार देईल'

शिर्डी बंद केल्यावर त्याचे थेट भाविकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने आता या वादावर दोन्ही बाजून सामोपचाराने तोडगा काढला पाहीजे. साईबाबांनाी जात-पात धर्म, जन्मस्थळाचा उल्लेख साईचरित्रात केला नाही आणि त्यांना ते मान्य नव्हते. तर मग हा वाद कशासाठी निर्माण केला? असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला. याबाबत आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्या बैठक बोलावली आहे. तेच हा प्रश्न सामोपचाराने सोडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Intro:Body:

'साईंच्या जन्मस्थळाचा वाद नको, शांतता पाळावी'

शिर्डी - देशात आधीच वाद सुरू आहेत. त्यात आणखी शिर्डी साईंच्या जन्मस्थळाचा वाद नको. त्यामुळे यासंदर्भात संप सुरू ठेवणे उचित ठरणार नाही, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. ते शिर्डीत बोलत होते. सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Conclusion:
Last Updated : Jan 19, 2020, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.