ETV Bharat / state

अहमदनगर शहरातला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला - अहमदनगर लॉकडाऊन

नगर शहरातील ३ मे पासून १० मे पर्यंत असलेला लॉकडाऊन मे पर्यंत पुढे वाढवण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा चारू असणार आहेत.

अहमदनगर शहरातला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला

author img

By

Published : May 10, 2021, 9:05 PM IST

अहमदनगर - नगर शहरातील ३ मे पासून १० मे पर्यंत असलेला लॉकडाऊन मे पर्यंत पुढे वाढवण्यात आला आहे. शहरातील रुग्णसंख्या ही कडक लॉकडाऊन लावल्यानंतरही कमी होत नसल्याचे दिसल्याने महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी आज हा निर्णय घेतला.

शहरातील रुग्णसंख्या होईना कमी

एप्रिल महिन्यापासून नगर शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही रोज चार हजारच्या मागे-पुढे होत आहे. अनेकदा ही रुग्णसंख्या साडेचार हजारापर्यंतही गेली आहे. या रुग्णसंख्येत एकट्या नगर शहरातील रुग्णसंख्या ६०० च्या पुढे असते. त्यात नगर शहराशी निगडित असलेली नगर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या एक हजार आहे. यात मृत्यूचे प्रमानपणही जास्त आहे. त्यामुळे शहरात तीन मे रोजी आयुक्त शंकर गोरे यांनी कडक निर्बंध जारी करत दहा मे पर्यंत लॉकडाऊन जारी केला होता. यात मेडिकल-हॉस्पिटल, दूध वगळता सर्व दुकाने,आस्थापना या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, कडक निर्बंध असतानाही शहरातील रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाही. त्यामुळे सोमवारी रात्री संपत असलेला लॉकडाऊन शनिवार दिनांक १५ मे च्या रात्री बारावाजे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

जिल्हाभरातील बहुतांशी रुग्ण नगरमध्ये उपचारार्थ
नगर शहरात जिल्हा सामान्य रूग्णालय, बूथ हॉस्पिटल तसेच अनेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन-व्हेंटिलेटर खाटां असल्याने जिल्हाभरातील रुग्ण मोठ्या संख्येने नगर शहरात उपचारासाठी येत आहेत. त्यांच्यासोबत नातेवाईकही मोठ्या संख्येने येतात. रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक हे सुपर स्प्रेडर बनत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.

किराणा-भाजीपाला, मांसाहार दुकाने बंदच राहणार
१५ मे पर्यंत वाढवण्यात आल्याने लॉकडाऊनमध्ये किराणा दुकाने, भाजीपाला-फळ विक्री, चिकन, अंडी, मटण, मासे विक्रीची दुकाने बंद असतील. त्याचबरोबर इतर खाजगी आस्थापना बंद राहतील असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. मेडिकल, हॉस्पिटलसाठीच बाहेर पडता येणार आहे. बँका, अत्यावश्यक कामांसाठी असलेल्या वाहनांसाठी पेट्रोल पंप सुरू असणार आहेत.

हेही वाचा - मराठा समाज आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बीडमध्ये केली होळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.