ETV Bharat / state

पाथर्डी तालुक्यातील तीन बालकांची शिकार करणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद - ahmednagar leopard capture by forest department

पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगा परिसरात तीन बालकांची शिकार करणारा नरभक्षक बिबट्याला अखेर पकडण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून या बिबट्याने अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. आतापर्यंत बिबट्याने तीन बालकांचा बळी घेतला आहे.

pathardi leopard captured in pATHARDI
नरभक्षक बिबट्या जेरबंद पाथर्डी न्यूज
author img

By

Published : Nov 6, 2020, 4:04 PM IST

पाथर्डी (अहमदनगर) - अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगा परिसरात तीन बालकांची शिकार करणारा नरभक्षक बिबट्याला अखेर सावरगाव परिसरात पकडण्यात आले आहे. वनविभागातर्फे या बिबट्याला तिसगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. या परिसरात आणखी किती बिबटे आहेत याची देखील वन विभागाकडून चाचपणी केली जात आहे. गेल्या महिनाभरापासून या बिबट्याने अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. आतापर्यंत बिबट्याने तीन बालकांचा बळी घेतला आहे.

पाथर्डी तालुक्यात बिबट्या जेरबंद
हेही वाचा - सातकरस्थळ येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या; हत्या कि नैसर्गिक मृत्यू?पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील वन परिक्षेत्र हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या पकडण्यात वनविभागाला गुरुवारी पहाटे यश आले आहे. बिबट्या सावरगाव हद्दीत पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पिंजऱ्यात बंद झालेल्या बिबट्याने बोकडाचा जवळपास निम्म्याने सकाळपर्यंत फडशा पाडला असल्याचे दिसून आले. शिरापूर डोंगराच्या माथ्यावर सावरगावातील अनेक भागात बिबट्या वावरत होता. काही दिवसांपूर्वीच गर्भगिरीतील अनेक रानडुकरांचा बिबट्याने फडशा पाडला होता.

काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका मुलीची हत्या केली होती. या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले होते. पाथर्डी तालुक्यातील काकडदरा भागात एका साडेतीन वर्षीय बालिकेला बिबट्याने उचलून नेले होते. त्यात तिचा मृत्यू झाला. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली होती.

हेही वाचा - अर्णब गोस्वामी अटक प्रकरण : भाजपा नेते राम कदम यांचे मंत्रालयाबाहेर उपोषण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.