शिर्डी(अहमदनगर) - देशभरात दिपावलीचा उत्सव मोठया उत्सवात साजरा करण्यात येतो. साईबाबांच्या मंदिरातही पारंपरिक आणि शास्रशुद्ध पद्धतीने लक्ष्मी, कुबेर पूजन करण्यात आले. साई समाधी मंदिरात लक्ष्मीची मूर्ती स्थापण्यात आली आहे. साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत या आपल्या यजमानांसमवेत पुजेसाठी बसल्या होत्या. यावेळी साई मंदिरात संस्थानच्या विविध विभागातील वही (चोपडी) पूजन तसेच साईबाबा संस्थानकड़े जमा असलेले सोने, चांदी, पैसे आणि लक्ष्मी कुबेर यांचे पूजन करण्यात आले. साईंच्या मंदिरातील तळघरात असलेल्या साईंच्या खजिण्याचेही पूजन करण्यात आले.
- साईनगरी दिव्यांनी उजळली -
दिपावलीच्या निमित्ताने साई समाधी मंदिर आकर्षक विद्युत दिव्यांनी सजवण्यात आले आहे. साईंच्या मूर्तीला सुवर्णमुकूट आणि सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आले होते. साईबाबा फकीर म्हणून शिर्डीत येऊन राहिले. मात्र, आज देशविदेशातील भक्तांनी साईंना केलेल्या विविध प्रकारच्या दानातून साईंची शिर्डी आज कोटयवधींची झाली आहे.
हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या बेनामी 27 कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू
साईबाबांना लक्ष्मीपुजनाच्या दिवशी द्वारकामाईत दिवे लावण्यासाठी तेल मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पाण्याने दिवे लावल्याचा चमक्तार केला होता. त्यामुळे आजही शिर्डीत अनेक साईभक्त दिप लावून साईंची ही आठवण ताजी करतात. देशभरातील विविध ठिकाणांहून साईभक्त शिर्डीला येवून साईबाबांच्या द्वारकामाई समोरील प्रांगणात लक्ष्मीची पूजा मांडत लक्ष्मीपूजन करतात.
- साईंना आज पिठलं-भाकरीचा नैवैद्य-
आज दिवाळीनिमित्ताने सर्वत्र गोडधोड जेवण केले जाते. साईबाबांनाही आज साईभक्तांनी सोन्याचांदीने मढवले आहे. सण उत्सवाला साईबाबांना सोन्याचे ताट-वाट्यात नैवैद्या दाखवला जातो. साईंना आज सोन्याचे ताट असले तरीही संध्याकाळचा नैवैद्या हा पिठलं-भाकर, कांदा असाच असतो.
या दिपावली उत्सवानिमित्त शनिशिंगनापूर येथील गणेश शेटे, शनेश्वर डेकोरेर्टस यांच्यावतीने देणगी स्वरुपात साई मंदिर आणि परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर शिर्डी येथील साईभक्त विजय तुळशीराम कोते यांच्या देणगीतून समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी व गुरूस्थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच रतलाम येथील साईभक्त अनिल सिसोदिया, श्री साई सेवा समिती ट्रस्ट यांनी मंदिर परिसरात व प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळ्या काढल्या आहेत.
हेही वाचा - साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अधिकार बहाल करण्यासंदर्भातील सुणावणी 4 ऑक्टोबरला