शिर्डी (अहमदनगर) - झेंडूला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून चार एकर शेतात कलकत्ता झेंडूची लागवड केली. सुरूवातीला चांगले बाजारभाव ही मिळाले पण आता बाजारभाव कोसळल्याने झेंडूची फुले तोडणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी चांगलेच वैतागले असून संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील अशोक धोंडीभाऊ पाडेकर या शेतकऱ्याने सोन्या सारख्या असलेल्या चार एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवला आहे.
खंदरमाळवाडी शिवारातील करंजेकर मळा याठिकाणी अशोक पाडेकर यांची शेती आहे. त्यांनी आडीच ते तीन महिन्यांन पूर्वी कलकत्ता झेंडूचे रोपे विकत घेवून चार एकर शेतात या झेंडूची लागवड केली होती. त्यासाठी फवारणी, खते औषधे यांचा मोठा खर्च झाला होता. काही महिन्यानंतर झेंडूचे उत्पादन सुरू झाले. गणेशोत्सवाच्या दरम्यान फुलांना चांगले बाजारभाव ही मिळाले. पण कालंतराने झेंडूचे बाजारभाव पाच ते दहा रूपये किलो झाले. त्यामुळे पाडेकर यांनी पुन्हा बाजारभाव वाढतील म्हणून झेंडूची फुले न तोडण्याचा निर्णय घेतला. तरीही एकदा त्यांनी फुले तोडून शेतीच्या बांदावर टाकून दिली होती.
त्यानंतरही बाजारभाव न वाढल्याने व तोडण्यासाठी परवडत नसल्याने ते चांगलेच वैतागले होते. जवळपास चार एकर झेंडू साठी त्यांचा सव्वादोन लाख रूपयांचा खर्च झाला होता. शेवटी पाडेकर यांनी वैतागून सोन्या सारख्या चार एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवला आहे. आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही. निसर्ग चक्रिवादाळाचे संकट, मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही पावसाने हिरावून नेला. वरून कोरोनाचे ही संकट त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सगळीकडूनच मरण झाले आहे. आज शेतकऱ्यांना कोणीच वाली राहीले नाही. त्यामुळे आजच्या घडीला बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
सोन्यासारख्या चार एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ, बाजारभाव नसल्याने शेतकरी वैतागले
बाजारभाव न वाढल्याने व तोडण्यासाठी परवडत नसल्याने ते चांगलेच वैतागले होते. जवळपास चार एकर झेंडू साठी त्यांचा सव्वादोन लाख रूपयांचा खर्च झाला होता. शेवटी पाडेकर यांनी वैतागून सोन्या सारख्या चार एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवला आहे. आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही. निसर्ग चक्रिवादाळाचे संकट, मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही पावसाने हिरावून नेला. वरून कोरोनाचे ही संकट त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सगळीकडूनच मरण झाले आहे.