ETV Bharat / state

Community Marriage Ceremony: असाही शाही विवाह शिर्डीत पार पडलाय; शिर्डीतील दाम्पत्याने केले 2250 मुलींचे कन्यादान

author img

By

Published : May 3, 2023, 9:48 PM IST

लग्न करायचं म्हंटल की, मोठा खर्च शेतकऱ्यासमोर उभा राहतो. परंतु शिर्डी येथे 61 जोडप्याचा शाही विवाह सोहळा पडला आहे. स्वतःला मुलगी जरी नसली तरी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून सुमीत्रा कोते आतापर्यंत 2250 मुलींची आई झाल्या आहेत.

Community Marriage Ceremony
सामुदायिक विवाह सोहळा
सामुदायिक विवाह सोहळा पार पडला

अहमदनगर: अत्यंत मंगलमय वातावरणात व हजारो वऱ्हाडींच्या साक्षीने 61 जोडप्यांनी एकमेकांना साथ देण्याची शपथ घेत, साईसाक्षीने आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. शिर्डीतील एका दाम्पत्याने गेल्या 23 वर्षापासून दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत 2250 मुलींचे कन्यादान केले आहे. सर्व सामान्य कुटूंबाला मोलाचा आधार त्यांनी दिला आहे.

संयोजकांच्या वतीने वरांची शहरातून सवाद्य मिरवणुक: घोड्यावर स्वार झालेले हे नवरदेव अगदी थाटामाटात निघालेली त्यांची मिरवणूक. अगदी आनंदाने सर्वजण नाचत आहेत. एखाद्या मुलीच्या बापाला आपल्या मुलीचे लग्न करायचे कसे? हि चिंता भेडसावत असते. मात्र शिर्डीतील कैलासबापू कोते यांनी अशा सर्व लोकांना मोलाचा आधार दिला आहे. एक दोन नव्हे तर गेल्या 23 वर्षापासून आत्तापर्यंत 2250 मुलींचे स्वखर्चाने शाही थाटामाटात त्यांनी कन्यादान केले आहे. दरवर्षी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन कैलासबापू करत असतात. आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतीषबाजी, मुलीला सगळा साजश्रृंगार, संसाराला लागणारी सर्व भांडी, सोन्याच्या मंगळसुत्रासह सगळा थाटमाट हे दाम्पत्य करत असतात. स्वतःला मुलगी जरी नसली तरी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून सुमीत्रा कोते 2250 मुलींची आई झाल्या आहेत.

आज पर्यंत 2250 जोडपी विवाह बंधनात: यावर्षी 21 बौद्ध आणि 40 हिंदू असे एकुण 61 विवाह या ठिकाणी पार पडले. आजवर या माध्यमातुन राज्यातील जवळपास 2250 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. सुमीत्रा कोते स्वतः लग्नाची सर्व तयारी करतात दोन महिने अगोदरच त्यांची लगबग सुरू होते. मुलींच्या साड्या, साज श्रृंगार, संसारोपयोगी साहित्य स्वतः खरेदी करतात. अगदी आपल्या मुलीचे लग्न असल्यासारखी त्यांची धावपळ सुरू असते. कोणत्याही मुलीच्या बापाला आपल्या मुलीचे लग्न म्हणजे ओझे वाटू नये, यासाठी आम्ही दरवर्षी हा सोहळा आयोजित करत असल्याचे कैलासबापू यांनी सांगितले.

विवाह सोहळ्यात दिला संदेश: श्री साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सव्वा रूपयात सर्वधर्मिय सामुदायिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांच्या पुढाकारातुन आयोजित सोहळ्याचे हे 23 वर्ष होते. लेक वाचवा, लेक शिकवा, स्त्री भ्रूण हत्या टाळा, हुंडा घेऊ नका- देऊ नका, वृक्षारोपन करा, शेतक-यांनो आत्महत्या करु नका, आपल्या मुला-मुलींचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यातच करा, अनावश्यक खर्चास फाटा दया असा संदेश या सोहळ्यातुन देण्यात आला.

लग्नाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करणार नाही: ज्यांचा विवाह इथे पार पडला त्यांच्या अपेक्षेपेक्षा छान आयोजन केल्याने नवरी नवरदेवही अगदी आनंदात होते. विवाहावर होणारा अनाठायी खर्च करण्यापेक्षा आपल्या संसाराला, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च उपयोग पडेल, समाजात जर असे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झाले तर, कोणताच बाप मुलीच्या लग्नाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करणार नाही. आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता असलेल्या अनेक पित्यांना हा विवाह सोहळा मोलाचा आधार ठरला आहे.
हेही वाचा: Shirdi Bandh 1 मे पासून पुकारलेले शिर्डी बंद आंदोलन अखेर मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.