ETV Bharat / state

कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च रोखता येणार नाही - किसान सभा - शेतकरी परिषद

किसान सभा सरकारच्या धोरणाविरोधात २० फेब्रुवारीपासून नाशिकहून लाँग मार्च काढणार आहे

किसान सभा
author img

By

Published : Feb 16, 2019, 3:50 PM IST

अहमदनगर - किसान सभा सरकारच्या विश्वासघाताविरोधात २० फेब्रुवारीपासून नाशिकहून लाँग मार्च काढणार आहे. मात्र, हा मार्च रोखण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली आहे. नगर येथे लाँग मार्च काढण्याची तयारी करण्यासाठी १३ फेब्रुवारीला शेतकऱ्यांची परिषद घेऊन निवेदन दिले म्हणून किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. त्यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

अखिल भारतीय किसान सभेने या घटनेचा सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. लोकशाही चौकटीत, शांतता, आत्मक्लेश आणि सत्याग्रही मार्गाने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला दडपून टाकण्याचा सरकारचा हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे. राज्यभरातील जनता हे सहन करणार नाही. डॉ. अजित नवले आणि दडपशाहीचा सामना करत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे राज्यभरातील शेतकरी ठामपणाने उभे राहतील. कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे दडपशाही करून लाँग मार्च रोखता येणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांची अंमलबजावणी करूनच हा प्रश्न सोडवावा लागेल. सरकारने ही बाब नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे.

लाँग मार्चची तयारी करण्यासाठी परिषद घेतल्याने कोठेही शांततेचा भंग झालेला नव्हता. परिषद घेत असल्याची पूर्वकल्पना किसान सभेने पोलिसांना अगोदरच दिली होती. परिषदेनंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल, असेही पोलिसांना अगोदरच कळविले होते. कार्यक्रम शांततेत करा, आमची त्याला काहीच हरकत नाही, असे पोलिसांनी सांगितले होते. ठरल्याप्रमाणे परिषद अत्यंत शांततेत पार पडली. निवेदन देण्याचा कार्यक्रमही अत्यंत शांततेत संपन्न झाला. मात्र, तरी देखील शेतकऱ्यांवर केसेस दाखल झाल्या. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

undefined

किसान सभा आणि राज्यभरातील शेतकरी या दडपशाहीचा मुकाबला करतील. शेतकऱ्यांचा हा दुसरा लाँग मार्च अभूतपूर्व ताकदीने यशस्वी करतील. २० फेब्रुवारी २०१९ ला नाशिक येथील मुंबई नाका येथून लाँग मार्चला सुरुवात होईल. ७ दिवस पायी चालून हा लाँग मार्च २७ फेब्रुवारीला मुंबईत धडकेल. मागील लाँग मार्च पेक्षा या लाँग मार्चमध्ये दुप्पट शेतकरी सामील होतील. राज्यभरातील २३ जिल्ह्यांत लाँग मार्चची जोरदार तयारी सुरू आहे. नगर जिल्ह्यात झालेल्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर या तयारीला नक्कीच आणखी वेग येईल.

भीषण दुष्काळ आणि सिंचनाचे प्रश्न, जमिनीचे हक्क, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट हमीभाव, शेतकरीहिताची पीक विमा योजना, शेतकरी-शेतमजुरांना व निराधारांना वाढीव पेन्शन, रेशन व अन्न अधिकार यासह सर्व शेतकरी मागण्या धसास लावल्याशिवाय राज्यभरातील शेतकरी आता स्वस्थ बसणार नाहीत.

*कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लॉंग मार्च रोखता येणार नाही!*
                      *....... किसान सभा*

सरकारच्या विश्वासघाताविरोधात २० फेब्रुवारीपासून नाशिकहून काढण्यात येत असलेला लॉंग मार्च रोखण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली आहे. अहमदनगर येथे लॉंग मार्च काढण्याची तयारी करण्यासाठी १३ फेब्रुवारीला शेतकऱ्यांची परिषद घेऊन निवेदन दिले म्हणून किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. 

अखिल भारतीय किसान सभा सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे. लोकशाही चौकटीत, शांतता, आत्मक्लेश व सत्याग्रही मार्गाने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला दडपून टाकण्याचा सरकारचा हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे. राज्यभरातील जनता हे सहन करणार नाही. डॉ. अजित नवले व दडपशाहीचा सामना करत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे राज्यभरातील शेतकरी ठामपणाने उभे राहतील. कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे दडपशाही करून लॉंग मार्च रोखता येणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांची अंमलबजावणी करूनच हा प्रश्न सोडवावा लागेल. सरकारने ही बाब नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे.   

लॉंग मार्चची तयारी करण्यासाठी परिषद घेतल्याने कोठेही शांततेचा भंग झालेला नव्हता. परिषद घेत असल्याची पूर्वकल्पना किसान सभेने पोलिसांना अगोदरच दिली होती. परिषदेनंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल असेही पोलिसांना अगोदरच कळविले होते. कार्यक्रम शांततेत करा, आमची त्याला काहीच हरकत नाही असे पोलिसांनी सांगितले होते. ठरल्याप्रमाणे परिषद अत्यंत शांततेत पार पडली. निवेदन देण्याचा कार्यक्रमही अत्यंत शांततेत संपन्न झाला. असे असताना नंतर कोणाच्या इशाऱ्यामुळे या केसेस दाखल झाल्या हे राज्यभरातील शेतकऱ्यांना नक्कीच चांगले माहीत आहे. 

किसान सभा व राज्यभरातील शेतकरी या दडपशाहीचा कसून मुकाबला करतील. शेतकऱ्यांचा हा दुसरा लॉंग मार्च अभूतपूर्व ताकदीने यशस्वी करतील. दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक येथील मुंबई नाका येथून लॉंग मार्चला सुरुवात होईल. सात दिवस पायी चालून हा लॉंग मार्च २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकेल. मागील लॉंग मार्च पेक्षा या लॉंग मार्च मध्ये दुप्पट शेतकरी सामील होतील. राज्यभरातील २३ जिल्ह्यांत लॉंग मार्चची जोरदार तयारी सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर या तयारीला नक्कीच आणखी वेग येईल. 

भीषण दुष्काळ व सिंचनाचे प्रश्न, जमिनीचे हक्क, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट हमीभाव, शेतकरीहिताची पीक विमा योजना, शेतकरी-शेतमजुरांना व निराधारांना वाढीव पेन्शन, रेशन व अन्न अधिकार यासह सर्व शेतकरी मागण्या धसास लावल्याशिवाय राज्यभरातील शेतकरी आता स्वस्थ बसणार नाहीत. 

डॉ. अशोक ढवळे 
आ.जे.पी.गावीत
किसन गुजर 
अर्जुन आडे 
उमेश देशमुख 
सुनील मालुसरे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.