शिर्डी (अहमदनगर) Kabaddi Players Sai Darshan: आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारे आकाश शिंदे आणि असलम इनामदार यांनी आज (गुरुवारी) शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर "ई टीव्ही भारतशी" बोलताना ते म्हणाले की 2018 साली गोल्ड मेडल मिळवण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न आम्हाला पूर्ण करता आलं याचा आम्हाला अभिमान आहे. भारताचा खेळ असलेल्या कबड्डीला आता चांगले दिवस आले असून यापुढे आणखीन चांगले दिवस येणार असल्याचं शिंदे आणि इनामदार म्हणाले आहेत.
भारताला 100 पेक्षा जास्त गोल्ड मेडल्स: कबड्डी खेळातील खेळाडू गरीब घरातील असतात. या खेळामुळे गरीब घरातील मुलांना खूप मोठे ग्लॅमर मिळालं असून खेळाडूंना कोट्यवधी रुपयांचा फायदा होत आहे. कबड्डीसाठी चांगले दिवस आले आहेत. जशा क्रिकेटच्या टेस्ट मॅच होतात तसेच कबड्डीच्या देखील होतील असा विश्वास यावेळी शिंदे आणि इनामदारने व्यक्त केलाय. 2018 साली भारताला 71 गोल्ड मेडल मिळाले होते. मात्र यंदाच्या वर्षी सौ पार असे पंतप्रधान म्हणाले होते. शंभर पेक्षा जास्त गोल्ड मेडल भारताला यंदाच्या वर्षी मिळाले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीही खूप आनंदी झाले असल्याचंही यावेळी शिंदे आणि इनामदार यांनी सांगितले.
साई संस्थानकडून शिंदे आणि इनामदारचा सत्कार: चीन येथील हांगझोऊ इथं 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने सुर्वणपदक मिळवले आहे. या स्पर्धेनंतर मायदेशी परतलेल्या खेळाडुंची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. नाशिक जिल्ह्यातील आडगावचा आकाश शिंदे आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानचा भुमिपुत्र असलम इनामदार या दोघांनी आपल्या घरी जाण्याआधी शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी दोघांनीही आपल्याकडील गोल्ड मेडल साईबाबांच्या समाधीवर ठेवत साईबाबांचे मनोमन आभार मानले. दरम्यान साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी आकाश शिंदे आणि असलम इनामदार या दोघांचाही साई मूर्ती आणि शॉल देऊन सन्मान केलाय.
हेही वाचा:
- Shirdi Sai Baba Darshan Pass : भाविकांची होणारी लूट थांबण्यासाठी साई संस्थाननं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
- Shilpa Shetty Sai Baba Darshan : आगामी चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईचरणी नतमस्तक, पाहा व्हिडिओ
- Bilpab Kumar Deb On Saibaba Darshan: साईबाबांची महिमा ऐकून शिर्डीत आलो- बिल्पब कुमार देब