शिर्डी (अहमदनगर) : पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेशी संबंधित काही जणांनी ( terrorist organization in Pakistan ) शिर्डीमध्ये तसेच नोएडामध्ये एका हिंदी चॅनेलच्या संपादकाच्या घराची रेकी केल्याची माहिती आहे. गुजरात एटीएसने यासंदर्भात एकाला अटक केल्याचे ( Gujarat ATS arrested one ) वृत्त सुत्रांच्या माध्यमातून समजते आहे.
या चॅनेलचे संपादक हिंदुत्ववादाचा प्रचार करत असल्याने त्यांचे कार्य रोखण्यासाठी ही रेकी केल्याचे समजते. अटक केलेल्या व्यक्तीने याची माहिती दिल्याचे सुत्रांच्या हवाल्याने आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे.
या दहशतवादी गटाच्या कार्यकर्त्यांच्या रडारवर आणखी ११ जण ( Eleven people on radar of terrorists ) असल्याचेही वृत्त आहे. यातील काही जणांच्या हत्येची सुपारीच या दहशतवाद्यांना दिल्याचे समजते.
गुजरात मधील दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींकडून त्यासाठी एका वृत वाहिनीच्या संपादकाच्या दिल्ली येथील कार्यालय व शिर्डी येथील त्याच्या घरी रेकी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात त्या वृत वाहिनीच्या संपादकाशी संपर्क साधला असता त्यांनी, 'मी ऑगस्टमध्ये शिर्डी येथे आलो असता माझ्या मागावर दहशतवादी होते. त्यांनी शिर्डी येथे तसेच त्यानंतर मी संगमनेर, कोल्हेवाडी, कोपरगाव ठिकाणी गेलो असता तेथेही माझ्या मागावर होते. त्याचबरोबर रेकी केल्याची माहिती अटकेनंतर दहशतवाद्यांनी कबुलीत दिली आहे. तसेच दिल्लीतील सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी रेकी केल्याची कबुली दिल्याची माहिती संपादकांनी दिली आहे. यामुळे शिर्डी परिसरात मोठी ( Terrorist eye on Shirdi city ) खळबळ उडाली आहे.