ETV Bharat / state

Leopard: बिबट्याने वन अधिकाऱ्यांना दिली हुलकावणी; घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

author img

By

Published : Dec 9, 2022, 1:27 PM IST

Leopard: जिल्ह्यात ब्राह्मणगाव शिवारातील शरद आहेर यांच्या शेततळ्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोपरगाव वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पंचनामा करण्यासाठी ब्राम्हनगाव शिवारातील आहेर यांच्या शेततळ्यावर गेले असता, त्याठिकाणी मुक्त संचार करणाऱया बिबट्याला वनाधिकाऱ्यांची चाहूल लागली, आणि त्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली.

Leopard
Leopard

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारातील शरद आहेर यांच्या शेततळ्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतात व शेततळ्यावर मुक्त संचार करणारा बिबट्या शेततळ्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याला वनाधिकाऱ्यांची चाहूल: या बिबट्याने परिसरात हैदोस घातला असून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनांवर हल्ला चढून मोठे नुकसान केले आहे. बुधवारी रात्री कृष्णा माधवराव सोनवणे यांच्या शेळीवर बिबट्यांने हल्ला चढवत ती शेळी फस्त केली आहे. कोपरगाव वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पंचनामा करण्यासाठी ब्राम्हनगाव शिवारातील आहेर यांच्या शेततळ्यावर गेले असता, त्याठिकाणी मुक्त संचार करणाऱया बिबट्याला वनाधिकाऱ्यांची चाहूल लागली, आणि त्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली.

शेतकरी व ग्रामस्थांकडून मागणी: काही क्षणात वन अधिकारी शेत ताळ्यावर पंचनामा करण्यासाठी पोहचले. मात्र काही अंतरावरच बिबटया असल्याचे त्यांना कल्पना नव्हती. मात्र हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे. मात्र बिबटया आणि वन अधिकाऱ्यांचा हा थरारक व्हिडियो सध्या कोपरगाव तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.