शिर्डी (अहमदनगर) - जिल्ह्यात शिर्डीसारखे मोठे संस्थान असल्याने नगर जिल्ह्यातील उत्तेराचा भाग साई संस्थानवर सोपविण्याची आमची इच्छा होती. मात्र संस्थानचा काराभार हा उच्च न्यायालयाच्या अंतर्गत असल्याने आमचा मनोदय साध्य झाला नसल्याची खंत पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव येथे ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सीजन प्लांट उद्घाटन प्रसंगी केल्याने आता नवा वाद उद्भवू शकतो.
कोरोनाचा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोणाचे सर्वाधीक पेशंट हे नगर जिल्ह्यात होते. यावेळी इतर जिल्ह्याप्रमाणे नगर जिल्ह्यातही खाटांची आणि ऑक्सीजनची कमतरता जाणवली होती. याच दरम्यान शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडे मोठा निधी आणि जागेची उपलब्ध असल्याने उत्तर नगर जिल्ह्यासाठी शिर्डीत एक मोठ कोवीड सेंटर उभारण्याचा महाविकास आघाडीचा मानस होता. मात्र साईबाबा संस्थानचा कारभार हा उच्च न्यायालयाच्या अख्यारीत चालत असल्याने साई संस्थानला धोरणात्मर निर्णय घेतांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेत. साई संस्थानचा कारभार न्यायालयाच्या अंतर्गत चालत असल्यानेच साई संस्थानच्या पैश्यावर शिर्डीत कोवीड सेंटर उभारण्याची योजना आम्हाला बासनात ठेवावी लागल्याची कबुलीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सीजन प्लाटच्या उद्घाटन प्रसंगी दिली आहे.
राज्य सरकारने शिर्डीत उत्तर नगर जिल्ह्यासाठी कोवीड सेंटर सुरु करण्याची तयारी सुरु केली होती. मात्र त्यावेळी शिर्डीकरांनी दबक्या आवजात त्यास विरोध सुरु केला होता. दुसरीकडे साईभक्तांनी दिलेल्या दानाच्या पैश्यातुन सरकारची वाहवाही केली जाईल अशीही शंका निर्माण केली जात होती. आज पालकमंत्र्यांनी आपल्या भाषनातुन व्यक्त केल्याने आता पुन्हा वादास सुरवात होवू शकते साईबाबा संस्थानचे आता पर्यंत जे कोणी अध्यक्ष झाले ज्या कोणी वाईट कारभार केला त्यांचा हिशोब लवकरच बाबांनी केल्याच आशुतोष काळेंनी मला सांगीतल्याच हसन मुश्रीफ म्हणाले आहे. आता आशुतोष काळे यांना साई संस्थानच अध्यक्ष केल आहे ते साई संस्थानच्या पैश्याचा योग्य विनीयोग करण्याचा मानस त्यांचा आहे. त्यांना अध्यक्ष केल आहे मात्र पूर्ण ट्रस्ट मंडळ न नेमल गेल्याने कोर्टाने त्याचे अधिकार गोठवले आहेत. तोही प्रश्न लवकर निकाली काढला जाईल असही मुश्रीफांनी स्पष्ट केले आहे.