अहमदनगर (राहुरी) - तालुक्यातील माहेगाव परिसरात उसाला अचानक आग लागली. त्यामधे सुमारे 25 एकर ऊस जळून खाक झाला आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या तत्परतेने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ( Ahmednagar District Sugarcane Area ) त्यामुळे परिसरात ( Damage to farmers due fire sugarcane ) असणारा सुमारे दीडशे एकर ऊस जळीत होण्यापासून वाचला आहे. पुंजाहरी मुंगसे आणि भाऊसाहेब पवार या शेतकऱ्यांचा हा ऊस होता.
परिसरातील सुमारे 150 एकर ऊस जळण्यापासून वाचला
राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील पुंजाहरी मुंगसे, भाऊसाहेब पवार या शेतकऱ्यांच्या ऊसाला सोमवारी दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली. ( Sugarcane suddenly caught fire in Rahuri ) या आगीत सुमारे 25 एकर उस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. घटनेदरम्यान, पोलीस पंकज आढाव यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली. त्यानंतर गावातील सुमारे शेकडो गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे परिसरातील सुमारे 150 एकर ऊस वाचवण्यात यश आले आहे. सदर आग कशी लागली हे अद्याप समोर आले नाही.
हेही वाचा - ओबीसी आरक्षण मिळू नये, याकरिता राजकीय षडयंत्र - विजय वडेट्टीवार