ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये १० लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - जामखेड दारू तस्करी

जामखेड तालुक्यातील झिकरी गावातील साईराम नामक हॉटेलमध्ये जमिनीखाली आरोपींनी एक मोठे लोखंडी पत्र्याचे कोठार केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात तयार होणाऱ्या दारूचा साठा उत्पादन शुल्क विभाच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

author img

By

Published : Aug 17, 2019, 11:54 PM IST

Updated : Aug 18, 2019, 2:03 AM IST

अहमदनगर - जामखेड तालुक्यातील झिकरी गावातील साईराम नामक हॉटेलमध्ये जमिनीखाली आरोपींनी एक मोठे लोखंडी पत्र्याचे कोठार केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात तयार होणाऱ्या दारूचा साठा उत्पादन शुल्क विभाच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. करमाळा रस्त्यावरील हा प्रकार घडला असून, महेश शिवाजी इकडे व ऋषिकेश अशोक काकडे यांना अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मात्र, हे अवैध रॅकेट चालवणारा भाऊसाहेब पाटील गरड हा मुख्य सूत्रधार फरार आहे.

जामखेड मध्ये १० लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

गोवा राज्यात तयार होणारी कमी किमतीची दारू अवैधपणे चोरून लपवून ठेवण्यात आली होती. ही दारू महाराष्ट्रात परवानगी असलेल्या विविध नामांकित विदेशी दारूच्या बाटलीत भरून विकण्याचा धंदा आरोपी करत होते. त्यासाठी लागणाऱ्या दारूच्या बाटल्या, विदेशी दारू कंपन्यांचे स्टिकर्स, झाकण, आदींचा मोठा साठा जमिनीखाली लपवून ठेवण्यात आला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्यातील विदेशी मद्याचे ५७ बॉक्सेस, प्लास्टिकचे २८ हजार सिलकॅप, २ हजार पत्रा बुच तसेच ५ हजार लेबल, १० हजार रिकाम्या बाटल्या असा साठा जप्त केला आहे. मद्याची वाहतूक करण्यासाठी चारचाकी असा एकूण १० लाख ३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी दिली.

Intro:अहमदनगर- दारू लपवण्याची अजब शक्कल, उत्पादन शुल्कने वापरली अक्कल..जामखेड मध्ये १० लाखांची दारू जप्त. 
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_goa_wine_siezed_pkg_7204297

अहमदनगर- दारू लपवण्याची अजब शक्कल, उत्पादन शुल्कने वापरली अक्कल..जामखेड मध्ये १० लाखांची दारू जप्त. 

अहमदनगर- भयाण रात्री हे खोदकाम कसले सुरू आहे आणि ते ही एका बंद पत्र्याच्या शेड मधे.. काय असेल या जमिनीखाली.. काय लपवलय असे जे इतकी लोकं खोदकाम करताहेत एव्हढ्या रात्रीच.. आणि कोण आहेत ही लोकं जी खोदकाम करताहेत !! उत्सुकता ताणली ना.. अहो अंधाऱ्या रात्री खोदकाम करणारी ही राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर विभागाचे पोलीस आहेत.. आणि ते छापा टाकत आहेत.. मात्र हा छापा जरा अजब-गजबच म्हणावा लागेल. कारण आरोपींनी मोठ्या अक्कल-हुशारीने दारू पहा कशी जमिनीखाली सुरक्षित लपवून ठेवली आहे ती. हे घटनास्थळ आहे नगर जिल्ह्यातील जामखेड जवळ करमाळा रोड वरील झिकरी गाव शिवारातल.. येथे असलेल्या साईराम हॉटेलच्या एका पत्राच्या शेड मधे जमिनीखाली आरोपींनी चक्क एक मोठे लोखंडी पत्राचे कोठार कुणालाही कळणार नाही असे करून ठेवले होते. या कोठरात एका व्यक्तीला उतरता येईल एव्हढे झाकण पण आहे. या कोठारात गोवा राज्यात तयार होणारी स्वस्तातली दारू अवैधपणे चोरून आणून ती लपवून ठेवण्यात आली होती. गोव्याची ही दारू महाराष्ट्रात परवानगी असलेल्या विविध नामांकित विदेशी दारूच्या बाटलीत भरून विकण्याचा हा गोरख धंदा आरोपी करत होते. त्यासाठी लागणाऱ्या दारूच्या बाटल्या, विदेशी दारू कंपन्यांची स्टिकर्स, बुच आदींचा भरपूर साठा या ठिकाणी जमिनीखाली लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी महेश शिवाजी इकडे आणि ऋषिकेश अशोक काकडे यांना उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अटक केलीय. मात्र हे अवैध रॅकेट चालवणारा भाऊसाहेब पाटील गरड हा मुख्य सूत्रधार फरार झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलीय..
महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्यातील विदेशी मद्याचे ५७ बॉक्सेस, प्लास्टिकचे 28 हजार
सिलकॅप, २ हजार पत्री बुच व ५ हजार लेबल, 10 हजार रिकाम्या बाटल्या असा साठा जप्त केला. विदेशी मद्याचा चाेरुन वाहतूक करण्यासाठी कार असा एकूण १० लाख ३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी दिली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

बाईट - पराग नवलकर,Conclusion:अहमदनगर- दारू लपवण्याची अजब शक्कल, उत्पादन शुल्कने वापरली अक्कल..जामखेड मध्ये १० लाखांची दारू जप्त. 
Last Updated : Aug 18, 2019, 2:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.