ETV Bharat / state

पत्नीच्या पाठोपाठ पतीचीही आत्महत्या, नवदाम्पत्याच्या मृत्यूने अहमदनगरमध्ये खळबळ - नवदांपत्याच्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ

जामखेड शहरामधील एका विवाहितेने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच तिच्या पतीनेही काहीवेळातच दुसऱ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.

पत्नीच्या आत्महत्येपाठोपाठ पतीनेही केली आत्महत्या, नवदांपत्याच्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ

author img

By

Published : May 13, 2021, 8:45 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील जामखेड शहरामधील बीड रोडजवळ राहणाऱ्या शिल्पा अजय जाधव (वय 28 वर्षे) या विवाहितेने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तिचा पती अजय कचरदास जाधव (वय 32 वर्षे) याला समजल्यानंतर त्यानेदेखील दुसऱ्या ठिकाणी काहीवेळातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या नवदाम्पत्याने एकाच दिवशी आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चार महिन्यांपूर्वीच झाला होता अजय-शिल्पाचा विवाह

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अजय व शिल्पा या दोघांचा नुकताच चार महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात विवाहसोहळा संपन्न झाला होता. बुधवारी (12 मे) दुपारी शिल्पा अजय जाधव (वय 28 वर्षे) हिने बीड रोड जवळील आदित्य गार्डन शेजारी असलेल्या राहत्या घरी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती तिचा पती अजय जाधव (वय 32 वर्षे) याला समजली. त्यानंतर त्याने देखील शहरातील मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या जार प्लॉटमधील ऑफिसमध्ये काही वेळातच गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट -

या नवदाम्पत्य पती-पत्नीच्या आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अजय याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, माझ्या आत्महत्येला मी जबाबदार असून कोणासही दोषी ठरवू नये. या नंतर या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मृताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव यांनी जामखेड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या दुर्लक्षामुळेच देशावर कोरोनाचे संकट; मंत्री बच्चू कडूंचा 'प्रहार'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.