ETV Bharat / state

पाथर्डी तालुक्यात पावसाची संततधार.. शेतमालाचे प्रचंड नुकसान - अहमदनगर पाथर्डी तालुका अतिवृष्टी बातमी

कपाशी पिकात पाणी साठल्याने शेकडो एकरातील कपाशीचे मुळे सडल्याने सुकून गेली आहे. उडीद, मुग हावरी असे पिके पावसाने भिजल्याने बुरशी लागून खाण्यास अयोग्य झाली आहेत. ऊस व मका असे उंच वाढणारी पिके जमीन गाळयुक्त झाल्याने हवेने जमिनीवर भूई सपाट होवून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

huge loss of agricultural produce due to continuous heavy rain in pathardi taluka at ahmednagar
पाथर्डी तालुक्यातील संततधारेने शेतमालाचे प्रचंड नुकसान
author img

By

Published : Sep 26, 2020, 9:31 PM IST

अहमदनगर - पाथर्डी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीनाले तुडुंब भरुन वाहत आहेत. यामुळे उभ्या पिकात पावसाचे पाणी साचेले असून कापणी करून मळणीसाठी तयार असलेल्या पिकांना मोड येवून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील मोहरी, शिरसाटवाडी, घाटशीळ पारगाव, कुतरवाडी, येळी, जांभळी, पिंपळगावटप्पा, मिडसांगवी, करोडी, कोकीपीर तांडा या ठिकाणचे तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून तालुक्यातील करंजी, घाटशिरस या पट्ट्यातील पश्चिम भाग वगळता तालुकाभर गेल्या आठ दिवसात अतिवृष्टी झाल्याने शेती मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पाथर्डी तालुक्यातील संततधारेने शेतमालाचे प्रचंड नुकसान

संततधार पाऊसामुळे गावोगावच्या रस्त्यांची खड्डे पडून चाळणी झाली असून शेतात कापणीसाठी तसेच कापणी होवून मळणीसाठी तयार असलेल्या बाजरीच्या कणसाला भिजपाऊसाने कोंब फुटले आहेत. कपाशी पिकात पाणी साठल्याने शेकडो एकरातील कपाशीचे मुळे सडल्याने सुकून गेली आहे. उडीद, मुग हावरी असे पिके पावसाने भिजल्याने बुरशी लागून खाण्यास अयोग्य झाली आहेत. ऊस व मका असे उंच वाढणारी पिके जमीन गाळयुक्त झाल्याने हवेने जमिनीवर भूई सपाट होवून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तयार झालेला कांदा पिकात पाणी साठल्याने तो जमिनीतच सडून गेला आहे. डाळिंब, संत्री, मोसंबी असे फळबागामध्ये फळांचा जमिनीवर सडा पडला आहे. कोरोना संसर्गामुळे बाजारपेठे बंद असल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता अतिवृष्टीने पुन्हा एकदा दुहेरी संकटात सापडला असून राज्य व केंद्र सरकारकडून मदतीची मागणी केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.