शिर्डी : नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना नेमका किती टोल भरावा लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. समृद्धी महामार्गावर जेवढा प्रवास तेवढाच टोल अशा पद्धतीने टोल आकारणी केली जाणार ( How much toll on Samruddhi Highway ) आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गावर जिथून तुम्ही प्रवास सुरू कराल तिथे नाही तर जीथे तुमचा प्रवास संपेल तिथे तुम्हाला टोल द्यावा लागणार ( Pay toll at end of Samruddhi Highway journey ) आहे.
महामार्गावर वाहने सुसाट : महाराष्ट्राच्या सम्रुध्दीसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सम्रुध्दी महामार्गाचा नागपुर ते शिर्डी हा पहीला टप्पा सर्व सामान्यांसाठी आता खुला करण्यात आला ( first bus run on Samruddhi highway ) आहे. महाराष्ट्रात बहुतांशी महामार्गांवर असलेले खड्डे आणि त्यामुळे लागणारा वेळ यामुळे आता शिर्डीसह मुंबई आणि इतर भागात येण्यासाठी जड वाहनांसह छोट्या वाहनांना वेळ लागतो. काल पंतप्रधानांनी महामार्गाचे उद्घाटन केले. दुपारी दोननंतर वाहने सुसाट या महामार्गाने धावू लागली. यात छोट्या कारची संख्या अधिक होती. आता छोट्या कारला किती टोल बसेल हा सर्वांनाच प्रश्न पडला. मात्र किमान 1 रुपया 73 पैसे, कमाल 6 रुपये 38 पैसे दराने टोल आकारला गेल्याने अंतर वेळ वाचल्याने पहीला प्रवास करणारे नागरीक जाम खुश होते.
पहिल्या टप्प्यात 19 टोलबूथ : नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सध्या सुरू झाला आहे. या पहिल्या टप्प्यात 19 टोलबूथ आहेत. छोट्या चार चाकी वाहनांसाठी प्रति किमी 1 रुपये 73 पैसे टोल निश्चित करण्यात आला आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या 520 किमी अंतराकरिता 900 रुपये टोल भरावा लागणार आहे. हलक्या व्यावसायिक किंवा मालवाहतूकीच्या वाहनांसाठी 2 रूपये 79 पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे. बस अथवा ट्रक या वाहनांसाठी 5 रूपये 85 पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे. मोठ्या व्यावसायिक वाहनांना 6 रूपये 38 पैसेच्या दराने टोल द्यावा लागणार आहे. समृद्धी महामार्गावर नागपूरपासून मुंबईपर्यंत एकूण 26 टोल बूथ असणार आहेत. मात्र सध्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यात 19 टोलबूथ कार्यरत झाले आहेत. प्रवासी वाहनांना टोल हा प्रवास सुरूवात करतानाच नाही तर प्रवास संपल्यावर द्यायचा ( Samruddhi Highway Toll System ) आहे.
नागपूर ते शिर्डी पहिली प्रवाशी बस धावली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्यानंतर नागपूर ते शिर्डी पहिली प्रवाशी बस रवाना करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बस रवाना झाली. साईबाबा संस्थानच्यावतीने रात्री १०.१५ वाजता संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांनी स्वागत केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. तसेच यात्रेचे आयोजक किरण पांडव व त्यांच्या समवेत आलेल्या ४७ प्रवाशांचा आणि बस चालकाचा पुष्पगुच्छ देवून यथोचित स्वागत करण्यात आले.